मुंबई, 02 सप्टेंबर : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावला जातो, टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. टिळा लावणे हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. टिळा लावणे शुभ आणि मंगलदायी मानलं जातं. टिळा चंदन, कुंकू, भस्म, गुलाल-अष्टगंध इत्यादीचा लावला जातो, प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे आहे. त्याचप्रमाणे कपाळावर वेगवेगळ्या बोटांनी टिळा लावण्याचा परिणाम आणि महत्त्वही वेगवेगळे आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया, कोणत्या बोटाने टिळा लावणे सर्वात शुभ मानले जाते. टिळा लावण्यासाठी बोटाचे महत्त्व - हिंदू धर्मानुसार जर कोणी शुभ कार्यासाठी घराबाहेर पडत असेल तर मधल्या बोटाने टिळा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे त्याचे काम चांगले होते. असे मानले जाते की, मधले बोट शनि ग्रहाशी संबंधित आहे आणि शनि ग्रह यशाचे प्रतीक आहे. तसेच अनामिकाने कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. सूर्यदेव अनामिकामध्ये वास करतात. अनामिकेने देवाच्या चित्रावरही टिळा लावला जातो. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने टिळा लावणे देखील शुभ असते. शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने टिळा लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. घरात सुख-समृद्धी नांदते. तर मृत्यूनंतर व्यक्तीच्या कपाळावर सर्वात लहान बोटाने टिळा लावला जातो, जे त्याच्या मोक्षप्राप्तीचे प्रतीक मानले जाते. हे वाचा - नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा या गोष्टी लक्षात ठेवा शास्त्रात टिळा लावण्याचे काही नियम आहेत. त्या नियमांनुसार टिळा लावणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार स्नान केल्यानंतरच टिळा लावावा. तसेच टिळा लावताना तोंड उत्तरेकडे असावे व स्वच्छ हाताने कपाळावर टिळा लावावा. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







