तिरुपती, 5 जुलै : भावा-बहिणीचं नातं घट्ट करणारा ‘रक्षाबंधन’ हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमा तिथीला हा सण साजरा केला जातो. परंतु भद्रकाळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं. यंदा श्रावण पौर्णिमेच्याच दिवशी भद्रकाळ आहे. त्यामुळे नेमकी राखी कधी बांधावी हे जाणून घेऊया. पाहूया, याबाबत तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्ण कुमार भार्गव काय सांगतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी संपेल. याच कालावधीत 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटे ते रात्री 09 वाजून 01 मिनिटापर्यंत भद्रकाळ असणार आहे.
अर्थातच रक्षाबंधन साजरा करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी सकाळी शुभ मुहूर्त नाही. मात्र या दिवशी रात्री 09 वाजून 01 मिनिटानंतर आपण हा सण साजरा करू शकता. तसेच 31 ऑगस्टच्या सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत श्रावण पौर्णिमा असल्याने आपण याआधीदेखील राखी बांधू शकता. याचाच अर्थ रक्षाबंधन हा सण यंदा 2 दिवस साजरा करता येणार आहे. Baby name: बजरंगबलीवरून तुमच्या बाळासाठी ही नावे ठेवू शकता; हनुमान चालिसेत आहे उल्लेख बहीण-भावाचं नातं हे अतिशय खोडकर असलं, त्यात लहान-मोठं भांडण, भयंकर खोड्या असल्या तरीही ते अत्यंत पवित्र नातं असतं. या नात्यातील प्रेम जपण्यासाठी, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यानिमित्ताने बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून तिच्याकडून रक्षणाचं वचन घेते. राखीचाच अर्थ रक्षण कर असा होतो. यंदा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त : 30 ऑगस्ट : रात्री 09 वाजून 01 मिनिटानंतर. 31 ऑगस्ट : सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत.