मुंबई, 26 मे: ग्रहांच्या शांतीसाठी केवळ रत्नच नाही तर झाडांची मुळेदेखील चमत्कारी लाभ देतात. चला जाणून घेऊया अशा झाडांच्या मुळांबद्दल जे तुम्ही धारण करताच तुमचे नशीब बदलतात आणि पैशांचा पाऊस पडू लागतो. अशोक वृक्षाच्या मुळाने दु:ख होते दूर अशोक वृक्षाची पाने तुम्ही पूजेत अनेकदा वापरली असतील. सुख-समृद्धीशी निगडित या वृक्षाविषयी असे म्हटले जाते की, त्याच्या खाली बसून दुःख होत नाही किंवा ज्याने सर्व दुःखांवर विजय मिळवला तो म्हणजे अशोक वृक्ष. अशोक वृक्षाचे मूळदेखील तुमच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ करणार आहे. विधिपूर्वक धारण केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैशाच्या ठिकाणी ठेवल्याने चमत्कारिक लाभही होतो.
केळीच्या मुळाने गरिबी होईल दूर पुष्कळ वेळा माणूस कर्जाच्या जाळ्यात इतका बुडून जातो की, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नाही. सर्व प्रयत्न करूनही तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. कर्जाचे हे विलय दूर करण्यासाठी केळीच्या झाडाच्या मुळाशी रोळी, तांदूळ, पाणी आणि फुले अर्पण करा. यानंतर शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी ज्या ठिकाणी पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा. जर तुम्ही केळीच्या रोपाची मुळे पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवली तर माझ्यावर विश्वास ठेवा, हे पवित्र मूळ पुष्कराजसारखे फायदे देते. महागड्या रत्नांऐवजी परिधान करा स्वस्त आणि प्रभावी उपरत्ने शुभफळ मिळण्यासाठी ही मुळे धारण करा सूर्याची कृपा मिळवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी रविवारी लाल किंवा गुलाबी कपड्यात बेलपत्राचे मूळ हातावर धारण करावे. चंद्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी सोमवारी खिरणीचे मूळ पांढऱ्या कपड्यात धारण करावे. मंगळाच्या शुभकार्यासाठी अनंतमूळ मंगळवारी लाल कपड्यात घाला. बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी विदराचे मूळ हिरव्या कपड्यात घाला. Vastu Tips of Kitchen: या उपायाने होणार नाही पैशाची कमतरता, लवकरच जुळेल लग्न गुरु ग्रहाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, गुरुवारी पिवळ्या कपड्यात हातावर केळीचे मूळ धारण करा. शुक्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या कपड्यात उंबराचे मूळ धारण करावे. शनिदेवाची आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी शमीचे मूळ निळ्या कपड्यात घाला. राहूशी संबंधित दोष दूर करण्यासाठी बुधवारी पांढर्या चंदनाचा तुकडा निळ्या कपड्यात घाला. केतूशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी निळ्या रंगाच्या कपड्यात अश्वगंधाचे मूळ धारण करावे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)