मुंबई, 24 मे: ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये प्रामुख्याने नऊ रत्नांची चर्चा करण्यात आली आहे, परंतु ही रत्ने कधी कधी खूप महाग असतात, तर कधी ती बनावट असण्याची शक्यता असते. रत्नांच्या जागी अर्ध-मौल्यवान खडे देखील घातले जातात जे स्वस्त तसेच प्रभावी असतात. उपरत्न आणि रत्नामधील मुख्य फरक असा आहे की, रत्ने दीर्घ कालावधीसाठी कार्य करतात तर उपरत्न अल्प कालावधीसाठी प्रभावी असतात. एका ग्रहासाठी प्रामुख्याने एक रत्न आणि अनेक उप-रत्न असतात. योग्य रत्न निवडून परिधान केल्यास निश्चित फायदा होतो.
सूर्य
-सूर्याचे मुख्य रत्न आहे - माणिक
- माणिकाच्या जागी तुम्ही तामडी, लालडी, लाल तुरमाळी आणि गार्नेटदेखील घालू शकता.
परंतु माणिकचा सर्वोत्तम उपरत्न हा "स्पाइनल" आहे.
हे अनामिकेत तांब्यामध्ये परिधान केले पाहिजे.
चंद्र
- चंद्राचे मुख्य रत्न आहे मोती.
- पर्लचे उपरत्न आहेत- मूनस्टोन, अॅगेट.
मोत्याऐवजी चांदीचा मूनस्टोन घालणे चांगले.
घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय
मंगळ
- मंगळाचे मुख्य रत्न आहे - कोरल
- कोरलचा एकच सर्वोत्तम उप-रत्न आहे - लाल हकीक
- हे उपरत्न तांब्यात घालणे फायदेशीर ठरते
बुध
- बुध ग्रहाचे मुख्य रत्न आहे - पाचू
- पाचूचे अनेक उपरत्न आहेत - हिरवे बैरूज, गोमेद, मरगज इ.
- पण यातील सर्वोत्कृष्ट रत्न आहे - मरगज
- हे उपरत्न चांदीमध्ये घालणे शुभ असते.
सौंदर्यासाठी महिलांना का महत्त्वाचे आहेत 16 श्रृंगार, जाणून घ्या धार्मिक कारणे
गुरू
-गुरू ग्रहाचे मुख्य रत्न पिवळा पुष्कराज आहे.
- पिवळा पुष्कराजचे उपरत्न आहेत - पिवळा बैरुज, सोनेरी, पिवळा सायट्रिन इ.
- यामध्ये पिवळा बैरूज हा उत्तम रत्न आहे
- पितळ किंवा सोन्यामध्ये हे परिधान करणे शुभ असते.
शुक्र
- हिरा हे शुक्राचे मुख्य रत्न आहे.
- डायमंडचे उपरत्न आहेत- जार्कन, अमेरिकन डायमंड आणि ओपल
- ओपल हे यातील सर्वोत्तम रत्न आहे.
- कधीकधी ओपल हिऱ्यापेक्षा चांगले कार्य करते
- हे चांदीमध्ये परिधान करावे
शनी
- शनीचे मुख्य रत्न आहे - नीलम
नीलमचे उपरत्न आहेत - निळा पुष्कराज, लॅपिस लाझुली, सोडालाइट इ.
- पण नीलमणीचा उत्तम पर्याय म्हणजे टँझानाइट.
- हे चांदीमध्ये घालणे शुभ असते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion