रवी पायक, प्रतिनिधी भिलवाडा, 20 जून : राजस्थान राज्य ज्याप्रमाणे प्राचीन हवेल्या आणि राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तेथील प्राचीन मंदिरंही जगप्रसिद्ध आहेत. आज आपण येथील अशा एका मंदिराबाबत माहिती करून घेणार आहोत, जिथे भाविकांनी लिहिलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. माती राणीच्या या मंदिराची अशी काय किमया आहे, जाणून घेऊया. भिलवाडा शहराच्या अरावली पर्वत रांगेवर तब्बल 1500 वर्षांपासून हे चामुंडा मंदिर वसलेलं आहे. भक्तांच्या म्हणण्यानुसार, या मंदिरात माता राणीची मूर्ती एखाद्या व्यक्तीने विराजमान केलेली नाही, तर देवीने नैसर्गिकरित्या याठिकाणी अवतार घेतला आहे, असं म्हटलं जातं. या मंदिरामागील पांढऱ्या भिंतीवर अनेक प्रार्थना, इच्छा लिहिलेल्या दिसतात. कारण इथे लिहिलेली प्रत्येक इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण होते, अशी गावकऱ्यांची मान्यता आहे.
या मंदिरात येऊन कोणी उज्जवल भविष्यासाठी प्रार्थना करतं, तर कोणी नोकरी मागतं. मात्र देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते, असे अनुभव गावकऱ्यांना आलेले आहेत. म्हणूनच पूर्वी याठिकाणी केवळ गावकरीच पूजा करायचे. परंतु हळूहळू मंदिराची ख्याती दूरदूरवर पसरल्यानंतर आता देवीचे आशीर्वाद घ्यायला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांसाठी वसतीगृहातील मुलींना बळजबरीनं नाचवलं, पोलिसांत गुन्हा दाखल या मंदिरावर भाविकांची अतूट श्रद्धा आहे. दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने आपण 23 वर्षांपासून दररोज न चुकता याठिकाणी येत असल्याचं सांगितलं. तर, मंदिराचे पुजारी भैरूराम म्हणाले, गेल्या 1500 वर्षांपासून आमच्या कुटुंबातील अनेक पिढ्या माता राणीची पूजा करत आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)