लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 20 जून : नाशिकच्या पहिणे या पर्यटनस्थळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या पहिणे येथील सर्वहरा परिवर्तन केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्यटकांसमोर बळजबरीने वसतिगृहातील मुलींना नाचवण्यात आलंय. संतप्त पालकांच्या तक्रारीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील पहिणे येथे ही संतापजनक घटना घडली आहे. पाहिने येथे जी 7 नेचर पार्क नावाने एक हॉटेल आहे. सध्या तिथे काजवा महोत्सव भरवण्यात आला आहे आणि त्याच दरम्यानचा हा धिंगाणा आहे खरंतर त्याच्या बाजूलाच सर्वहारा परिवर्तन केंद्र या खाजगी संस्थेचे वसतीगृह आहे. याच वसतीगृहातील अल्पवयीन मुलींना या पर्यटकांसोबत येथील संस्थाचालक आणि शिक्षकांनी दमदाटी करुन नाचण्यास सांगिल्याची बाबसमोर आली. पालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून, ही धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अट्रोसिटी, शोषण आणि अत्याचार या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी दिली. (20 वर्षीय गावगुंडाने पुणे शहराला रात्री धरलं वेठीस; पोलिसांनी असा उतरवला माज) पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरही संस्थेने ह्या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. विशेष, म्हणजे या संपूर्ण प्रकारणावर धातुर्मातुर उत्तर देत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. ( दर्शनाचा मृत्यू नेमका कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा ) ही धक्कादायक बाब समोर आल्यांनतर पालकांनी आपल्या मुलींना घरी आणत दुसऱ्या शाळेत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानीत आहे. इंग्रजी माध्यमाची ही शाळा आहे. शाळेला जोडूनच यंदाच्या वर्षी वसतीगृह सुरू करण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे, शाळा सुरू होण्यापूर्वीच 15 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना बोलवून घेतले होते. त्यात संगणक प्रशिक्षणच्या नावाखाली बोलावण्यात आले होते. ते शिक्षण सुद्धा देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपासात कोणत्या बाबीसमोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.