ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 30 मे: आपल्याकडे देवाला नवस करण्याची एक प्रथा आहे. आपली मनोकामना पूर्ण झाली की लोक नवस पूर्ण करतात. पण नवस फेडण्यासाठी 10 वर्षांचं वेटिंग आहे असं कुणी सांगितलं तर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. परंतु, असं एक मंदिर महाराष्ट्रात असून जिथं नवस फेडण्यासाठी तब्बल 10 वर्षे वाट पाहावी लागते. लातूर जिल्ह्यातील माकणी येथे हे 400 वर्षे जुनं हनुमान मंदिर आहे. माकणीतील हनुमान मंदिर माकणी येथील हनुमान मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराची निर्मिती 400 वर्षांपूर्वी झाली. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची पंचक्रोशित ख्याती आहे. या ठिकाणी केलेला नवस पूर्ण होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर ठिकाणांहूनही अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच लातूरच्या बाजूला असलेल्या उस्मानाबाद, नांदेड, बीड या जिल्ह्यातील लोक येथे दर्शनासाठी व आराधनाच्या कार्यक्रमासाठी येतात.
काय आहे आराधना? माकणीतील हनुमान मंदिरात गेली 200 ते 250 वर्षांपासून आराधनाची परंपरा आहे. नवस फेडण्यासाठी महाप्रसादाची पंगत घालण्याला येथे आराधना म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात वर्षात एक दोन आराधना होत. ही परंपरा वर्षानुवर्षी वाढत जाऊन आता वर्षाला 60 ते 70 आराधना होतात. आराध्याचा महाप्रसाद तयार करण्यासाठी गावातील सर्व स्त्री पुरुष मिळून विनामूल्य काम करतात. घरटी माणूस आराधनात सहभागी सुमारे 8 हजार लोकसंख्येच्या माकणी गावातील प्रत्येक घरातील स्त्री-पुरुष येथे विनामूल्य सेवा करतात. ही सेवा परंपरागत असून ज्यांच्या पूर्वजांनी जी कामे केली तीच कामे पुढची पिढीही करते. कुणी स्वयंपाक करत असेल तर त्यांची पुढची पिढी स्वयंपाकच करते. तर कुणी जेवण वाढत असेल तर ते तेच काम करतात. मंदिराच्या कळसावर बसलाय शेषनाग, मंदिरात 9 नागाची कुळं, काय आहे रहस्य? एका वर्षात 60 ते 70 आराधना एका वर्षामध्ये 60 ते 70 आराधना केल्या जातात. आतापर्यंत आराधनेसाठी नोंद केलेल्या भक्तांची संख्या बाराशे इतकी असून पुढील दहा वर्षापर्यंतचा आराधनांचा आराखडा तयार आहे. जानेवारी ते जून या काळामध्ये दर मंगळवार आणि शनिवार या दिवशी आराधनाचा कार्यक्रम माकणी येथे पार पडतो. एका आराधनेच्या पंगतीमध्ये 13 ते 14 हजार लोक बसतात. यामुळे हा स्वयंपाक बनवण्यासाठी 14 क्विंटल गव्हाचे पीठ लागते. याच सोबत भात, साधं वरण आणि एसर वडी हे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. माकणी हनुमान मंदिराचा इतिहास माकणी गावातील हनुमान मंदिराच्या समोर नद्या बुवा या बालब्रह्मचारी महाराजांची जिवंत समाधी आहे. त्या मंदिराचे बांधकाम त्यांनीच केले असावे असे गावकरी बोलतात. मंदिराच्या समोर एक जुने चिंचेचे झाड होते. त्याचा बुंधा हा अंदाजे 12 ते 15 फूट गोलाकाराचा असावा आणि त्याच्या फांदी 25 ते 28 मीटर पर्यंत लांब होत्या. यामुळे त्या चिंचेच्या झाडाचे वय 300 वर्ष असावे असे जाणकार सांगतात. अद्भूत अशी कोराडीची महालक्ष्मी देवी, पाहा Video काय आहे आख्यायिका राजकीय नेतेही करतात आराधना लातूर जिल्हा हा राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्यातील प्रत्येक राजकारणी या मंदिरामध्ये आपल्या मनातील संकल्प बोलून नारळ बांधतो. फलित प्राप्त झाल्यानंतर ते नारळ सोडून आराधनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची आराधना या मंदिरात झाली आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)