जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Temple Dresscode: मंदिरात जाताना काय कपडे घालता याकडे लक्ष द्या; महाराष्ट्रातील 20 मंदिरात ड्रेसकोड

Temple Dresscode: मंदिरात जाताना काय कपडे घालता याकडे लक्ष द्या; महाराष्ट्रातील 20 मंदिरात ड्रेसकोड

Temple Dresscode: मंदिरात जाताना काय कपडे घालता याकडे लक्ष द्या; महाराष्ट्रातील 20 मंदिरात ड्रेसकोड

Chhatrapati Sambhaji Nagar Temple Dresscode : राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 05 जुलै : मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कपडे न घालता, मंदिरांमध्ये प्रवेश करताना पेहराव योग्य असावा, अशी मागणी समोर येत आहे. काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना आपल्या संस्कृतीला शोभेल असा पेहराव परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पाचू वापरताय? तर हे करू नका, धनहानीची असते शक्यता, जाणून घ्या नियम राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे. याला काही ठिकाणी पाठींबा मिळत असून, काही ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत शहरातील वेगवेगळ्या 20 मंदिरात पेहरावाबाबत फलक लावण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत. Fengshui Vastu: संपत्तीत होईल वाढ, या खास वस्तू आजच आणा घरी!

अश्लीलता वाढवणारे, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असे निर्णय घेत त्याबाबत मंदिरात फलक लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात असेच फलक लावण्यात आले आहेत. शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक लावल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरातील संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून तरुणांनी हाफ पँट घालून मंदिरात येऊ नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. तसेच फॅशनच्या नावाखाली तरुणींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट तसेच लोअर घालून मंदिरात येऊ नयेत. विविध प्रकारचे कपडे परिधान करणे हा वैयक्तिक मुद्दा असला तरीही मंदिर ही श्रद्धेची जागा असल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

यापूर्वी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला विरोध झाल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रेस कोडच्या निर्णयावरुन माघार घेतली होती. तसेच कपड्यांवरुन भाविकांना कोणतेच निर्बंध घातले नसल्याचं सांगण्यात आले होते. त्यामुळे आता संभाजीनगर शहरातील मंदिरांनी घेतलेल्या निर्णयाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात