मुंबई 25 ऑक्टोबर : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मंगळवार 25 ऑक्टोबरला आहे. या सूर्यग्रहणामुळे दीपावलीनंतर येणाऱ्या सणाच्या तारखा पुढे गेल्या आहेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ग्रहण काळात अन्न खाऊ नये. धार्मिक पुराणातील उल्लेखानुसार असे मानले जाते की ग्रहण काळात मनुष्य जेवढे जास्त धान्य खाईल, त्याला तेवढी वर्षे नरक यातना भोगावी लागतात. याशिवाय सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने व्यक्तीला पोटाचे आजार होतात, असेही नमूद केले आहे. ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांना तर स्वतःची विशेष काळजी घ्यावीच लागते. पण लोकांनाही काही बंधनं पाळावी लागतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया ग्रहण काळात अन्न खाणे अशुभ का मानले जाते.
Surya Grahan 2022 : ऐन दिवाळीतील सूर्यग्रहणात 5 राशींचं फळफळणार नशीब; होणार लक्ष्मीची कृपाग्रहण काळात अन्न खाणे अशुभ का आहे? हिंदू धार्मिक पुराणांमध्ये असे सांगितले आहे की, केवळ सूर्यग्रहणाच्या वेळीच नव्हे तर चंद्रग्रहणाच्या वेळीही अन्न खाऊ नये. याशिवाय ग्रहणाच्या काही वेळ आधी कुश किंवा तुळशीची पाने अन्नपदार्थात टाकावीत आणि ग्रहण संपल्यानंतर घराबाहेर फेकून द्यावीत असाही उल्लेख आहे. आंघोळ केल्यावरच अन्न घ्या. कारण ग्रहणाच्या वेळी वातावरणात असलेले बॅक्टेरिया तुमच्या शरीरात अडकतात.
आंघोळ केल्यानंतर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरातून निघून जातील. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलायचे झाले तर सूर्यग्रहणाच्या वेळी वातावरणात येणार्या अतिनील किरणांमुळे अन्न विषारी होते हे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये समोर आले आहे. म्हणून, कुश किंवा तुळशीची पाने शिजवलेल्या अन्नावर ठेवली जातात किंवा बहुतेक लोक ग्रहण काळात उपवास करतात. 27 वर्षांनी दिवाळीत असा योगायोग; सूर्यग्रहणात काय करावं, काय टाळावं जाणून घ्या जरी ग्रहण काळात अन्न खाण्यास मनाई आहे, परंतु काही परिस्थितींमध्ये काही लोकांना खाण्याची सवलत दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला किंवा रुग्ण अन्न घेऊ शकतात. मान्यतेनुसार गरज भासल्यास हे सर्व लोक सूर्यग्रहणाच्या एक तास आधी अन्न घेऊ शकतात.