जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शनिवारी आहे सीतानवमी! सुखी संसारासाठी पती-पत्नीनं एकत्र अशी करावी पूजा

शनिवारी आहे सीतानवमी! सुखी संसारासाठी पती-पत्नीनं एकत्र अशी करावी पूजा

सीतानवमी 2023

सीतानवमी 2023

sita navami 2023 date: रामनवमीच्या बरोबर एक महिन्यानंतर सीता नवमी येते. प्रभु श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला आणि माता सीतेचा जन्म वैशाख शुक्ल नवमीला झाला, या दिवशी पूजा करण्याचे फायदे जाणून घ्या

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमी साजरी केली जाते. या तिथीला माता सीतेचा जन्म झाला. त्यामुळे या दिवसाला सीता जयंती असेही म्हणतात. सीतेचे वडील मिथिलेचे राजा जनक होते, म्हणूनच सीतेला जानकी असेही म्हणतात. त्यामुळे सीता नवमीला जानकी नवमी असेही म्हणतात. रामनवमीच्या बरोबर एक महिन्यानंतर सीता नवमी येते. प्रभु श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला आणि माता सीतेचा जन्म वैशाख शुक्ल नवमीला झाला. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार यांनी सीता नवमी तिथी, पूजा मुहूर्त, शुभ योग इत्यादींची दिलेली माहिती पाहुया. सीता नवमी 2023 तिथी मुहूर्त - हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी शुक्रवार, 28 एप्रिल रोजी दुपारी 04.01 वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी, 29 एप्रिल, शनिवार, संध्याकाळी 06.02 वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीच्या मान्यतेनुसार 29 एप्रिल रोजी सीता नवमी साजरी होणार आहे. सीता नवमी 2023 पूजा मुहूर्त - 29 एप्रिल रोजी सीता नवमीच्या दिवशी सकाळी 10.19 वाजता पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि दुपारी 12.56 पर्यंत चालेल. अशा स्थितीत सीता नवमीच्या दिवशी पूजेसाठी 02 तास 37 मिनिटे उपलब्ध असतील.

News18लोकमत
News18लोकमत

रवियोगात सीता नवमी साजरी होईल - यावर्षी सीता नवमीच्या दिवशी रवियोग तयार झाला आहे. या दिवशी दुपारी 12:47 पासून रवि योग सुरू होत असून तो दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी पहाटे 05:05 पर्यंत राहील. या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त सकाळी 11.12 ते दुपारी 12.04 पर्यंत आहे. हे वाचा -  उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे हे चमत्कारिक फायदे; हसतं-खेळतं राहतं कुटुंब सीता नवमीचे महत्त्व - सीता नवमीच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि देवी सीतेसह प्रभु श्रीरामाची पूजा करतात. हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते. पतीला दीर्घायुष्य लाभते, असे मानले जाते. सीता नवमीचे उपाय - 1. सीता नवमीच्या दिवशी विवाहित महिलांनी माता सीतेला श्रृंगाराचे साहित्य अर्पण करावे. यामुळे त्यांना अखंड सौभाग्य मिळेल. 2. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने एकत्र देवी सीता आणि प्रभु श्रीरामाची पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि शांत राहील. हे वाचा -  शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram , Religion
  • First Published :
जाहिरात
जाहिरात