जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शनीची उलटी चाल सुरू! तुमच्या राशींवर होईल परिणाम; 'या' राशीला सर्वाधिक लाभ

शनीची उलटी चाल सुरू! तुमच्या राशींवर होईल परिणाम; 'या' राशीला सर्वाधिक लाभ

महामृत्युंजय जप आणि भगवान शिवची प्रार्थना करणं फायदेशीर ठरेल.

महामृत्युंजय जप आणि भगवान शिवची प्रार्थना करणं फायदेशीर ठरेल.

शनीदेवाच्या उलट दिशेने मार्गक्रमणाचा काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शनी चालीसेचं पठण करणं, त्यांची पूजा करणं फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर हनुमानाची पूजा, व्रत करणं, हनुमान चालीसेचं पठण करणंही लाभदायी ठरेल.

  • -MIN READ Local18 Uttarakhand
  • Last Updated :

ओम प्रयास, प्रतिनिधी हरिद्वार, 20 जून : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर विशेष प्रभाव असतो. आपलं सुख, दुःख जन्मपत्रिकेतील ग्रहांच्या सद्यस्थितीवर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. खरंतर सध्या शनीचा उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पुढील पाच महिने शनी उलट्याच दिशेने चालणार आहे. तर, राहू आणि केतूही मागे सरकतील. याचा परिणाम काही राशींवर होण्याची शक्यता आहे. शनीच्या वक्र स्थितीमुळे सिंह, मीन, कर्क, इत्यादी राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असं उत्तराखंडच्या हरिद्वारचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित मनोज कुमार त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. शनीदेवाच्या उलट दिशेने मार्गक्रमणाचा काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शनी चालीसेचं पठण करणं, त्यांची पूजा करणं फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर हनुमानाची पूजा, व्रत करणं, हनुमान चालीसेचं पठण करणंही लाभदायी ठरेल.

News18लोकमत
News18लोकमत

शनीच्या उलट चालण्याने कर्क, सिंह, धनु या राशी असलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक कामात व्यत्यय येईल. त्यांच्या घरात वाद होतील. शिवाय प्रकृतीसंबंधी समस्याही उद्भवतील. तर, मेष आणि वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची ही चाल अत्यंत लाभदायी ठरणार आहे. आपल्याला संपत्ती खरेदी करण्यासाठी किंवा नव्या बांधकामासाठी ही वेळ अनुकूल आहे. परंतु आपली कायदेशीर कामं चालली असतील तर त्यासंदर्भात नुकसान होण्याची शक्यता आहे. हळद लागली, नवरी पळाली! घरच्यांनी जिवंत अंत्ययात्रा काढून असं काही केलं की गाव पाहतच राहिलं! शनीच्या या स्थितीचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या व्यक्तींना होईल. तर, कन्या राशीच्या व्यक्तींना व्यवसाय किंवा व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी महामृत्युंजय जप आणि भगवान शिवची प्रार्थना करणं फायदेशीर ठरेल. रुद्राभिषेक केल्यानेही शनिदेवाची ही चाल लाभदायी ठरेल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात