जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / शनीच्या साडेसातीचा या भाग्यशाली राशींवर होत नाही परिणाम

शनीच्या साडेसातीचा या भाग्यशाली राशींवर होत नाही परिणाम

शनीच्या साडेसातीचा या भाग्यशाली राशींवर होत नाही परिणाम

कोणत्याही कामात येत नाही अडथळा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मे:  ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यासाठी अडीच वर्षे लागतात. या कालावधीला शनीचा ढय्या असेही म्हणतात. शनीची साडेसाती आणि ढय्या अत्यंत कठीण काळ मानला जातो. शनी साडेसातीचा असेल तर जीवनात प्रत्येक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. साडेसाती असेल तर माणसाचा प्रत्येक निर्णय चुकू लागतो, जीवनात संघर्ष वाढतो आणि मित्रही शत्रू होतात.

News18लोकमत
News18लोकमत

प्रत्येक राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव नक्कीच पडतो, परंतु तीन राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव फारच कमी असतो. जेव्हा शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा दशा बदलतो तेव्हा त्या राशींना शुभ आणि अशुभ असे दोन्ही फळ मिळतात. शनीच्या साडेसातीचा काही राशींवर परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कामात अडथळा येत नाही. Vastu Tips In Marathi: चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे शनि साडेसातीचा प्रभाव जर एखाद्याच्या कुंडलीत कोणत्याही शुभ ग्रहाची दशा आधीच चालू असेल आणि याच दरम्यान शनीची साडेसातीही सुरू होत असेल तर अशा स्थितीत शनिदेव क्वचितच वाईट नजर टाकतात. या लोकांच्या कोणत्याही कामात अडथळा येत नाही. या लोकांना प्रत्येक कामात नक्कीच यश मिळते. मात्र, यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कुंभ आणि मकर ही शनीची स्वतःची राशी आहेत. दुसरीकडे, तूळ राशीमध्ये शनि उच्च आहे. अशा स्थितीत शनीची साडेसाती संपल्यानंतरही या तीन राशींवर शनीचा प्रभाव कमी असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा या रंगांचे पडदे याउलट जर कुंडलीत तिसऱ्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात शनिदेव असतील तर शनि साडेसाती असूनही व्यक्तीवर त्याचा अशुभ प्रभाव पडत नाही. त्यापेक्षा शनिदेव शुभ आणि फलदायी आहेत. राशीच्या कुंडलीत चंद्र बलवान घरात बसला असेल तर शनीच्या साडेसातीच्या काळातही राशीवर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही. या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात