जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Sankashti Chaturthi 2022 : चंद्रपूजेने संपन्न होतं संकष्टी चतुर्थीचं व्रत; पाहा तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi 2022 : चंद्रपूजेने संपन्न होतं संकष्टी चतुर्थीचं व्रत; पाहा तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi 2022 : चंद्रपूजेने संपन्न होतं संकष्टी चतुर्थीचं व्रत; पाहा तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्राच्या पूजेला महत्त्व आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. जाणून घ्या संकष्टी चतुर्थी पूजेचा मुहूर्त आणि तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 नोव्हेंबर : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणाधिपती संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणेश भक्त उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. दिवसभर उपवासानंतर रात्री चंद्रदेवाची पूजा करून त्यांना अर्घ्य देतात आणि संकष्टीचा उपवास पूर्ण होतो. या व्रतामध्ये चंद्राच्या पूजेला महत्त्व आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या दिवशी व्रत केल्यास श्री गणेशाच्या आशिर्वादाने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचे व्रत ठेवल्याने आणि या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केल्याने बाप्पांचे आशिर्वाद प्राप्त होतात. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून संकष्टी पूजेचा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

Sankashti Chaturthi 2022 : उपवास करता पण संकष्टी चतुर्थीचं महत्त्व माहिती आहे का? मुहूर्त, पूजा विधीही पाहा

नोव्हेंबर संकष्टी चतुर्थी 2022 पंचांगानुसार या वर्षी कार्तिक कृष्ण चतुर्थी तिथी शुक्रवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10.25 वाजता सुरू होत असून शनिवार, 12 नोव्हेंबर रोजी रात्री 08.17 पर्यंत वैध आहे. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी व्रत 12 नोव्हेंबरला ठेवण्यात येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

संकष्टी चतुर्थी 2022 पूजा मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 08.02 ते 09.23 पर्यंत आहे. याशिवाय दुपारी 01:26 ते सायंकाळी 04:08 असाही शुभ मुहूर्त आहे. या दिवशी राहुकाल सकाळी 09:23 ते 10:44 पर्यंत आहे. चंद्रोदयाच्या वेळा मुंबई : 09:02 PM पुणे : 09:02 PM नागपूर : 08:33 PM ठाणे : 09:04 PM नाशिक : 08:58 PM कल्याण : 09:03 PM औरंगाबाद : 08:52 PM सोलापूर : 08:55 PM कोल्हापूर : 09:04 PM उल्हासनगर : 09:03 PM मालेगाव : 08:54 PM रत्नागिरी : 09:05 PM सातारा : 09:01 PM नाशिक : 08:56 PM अहमदनगर : 08:54 PM

Sankashti Chaturthi 2022 : सर्वांवर होईल बाप्पाची कृपा; संकष्टी चतुर्थीच्या द्या अशा शुभेच्छा

सिद्ध योगातील संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी सिद्ध योगात आहे. सकाळपासून रात्री 10.04 पर्यंत सिद्ध योग आहे. तेव्हापासून साध्यायोग सुरू होईल. सिद्ध योगात केलेले कार्य सफल होते. अशा स्थितीत तुम्ही सकाळच्या मुहूर्तावर गणेशजींची पूजा करा, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि सर्व संकटे दूर होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात