Sankashti Chaturthi 2022 : सर्वांवर होईल बाप्पाची कृपा; संकष्टी चतुर्थीच्या द्या अशा शुभेच्छा
हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकट चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाची विधीवत पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीला भक्त श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसोबतच उपवासही करतात. या शुभ दिनी तुम्ही मित्र नातेवाईकांना येथे दिलेल्या शुभेच्छा देऊ शकता.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच श्री गणराया चरणी प्रार्थना, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/ 9
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/ 9
आज संकष्ट चतुर्थी, गणरायाच्या पूजेचा दिवस, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा! तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
6/ 9
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर, अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/ 9
संकष्टी चतुर्थीनिमित्त दूर होवोत तुमची सर्वं संकटे, बाप्पाच्या आशिर्वादाने पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, संकष्ट चतुर्थी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
8/ 9
तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!
9/ 9
श्री गणेशाची कृपादृष्टी कायम, तुमच्या पाठिशी राहावी हीच प्रार्थना, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!