मुंबई, 12 ऑक्टोबर : हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी देवतेची पूजा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी तिथी किंवा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीही गणपतीची पूजा करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो. हा दिवस संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो.
असा विश्वास आहे की, जे हा दिवस सर्व विधीपूर्वक पाळतात श्रीगणेश त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करतात. देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. देवाला नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका टाळाव्या आणि काय करावे याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
ऑक्टोबरर महिन्याच्या 13 तारखेला म्हणजेच गुरुवारी संकष्ट चतुर्थी आहे. याचदिवशी करवा चौथदेखील आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास रात्री 8. 46 वाजता चंद्राची पूजा करून आणि देवाला नैवेद्य दाखवून सोडता येईल.
देवाला नैवेद्य दाखवताना टाळा या चुका
- देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तूपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न आवडते.
- देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका. नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल.
- पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशी पत्र टाकले जात नाही. महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.
Diwali 2022 : दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत?
- देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे, पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायीला खाऊ घालावा. नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा. असे केल्याने देव प्रसन्न होतो. असे म्हणतात की जे लोक प्रसादाशी संबंधित या नियमाचे भक्तीभावाने पालन करतात, त्यांना जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि घर सुखाने भरलेले राहते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh chaturthi, Lifestyle, Religion