जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / गणपती व कार्तिकेय व्यतिरिक्त महादेवाला होती 8 मुले, जाणून घ्या रंजक जन्मकथा

गणपती व कार्तिकेय व्यतिरिक्त महादेवाला होती 8 मुले, जाणून घ्या रंजक जन्मकथा

गणपती व कार्तिकेय व्यतिरिक्त महादेवाला होती 8 मुले, जाणून घ्या रंजक जन्मकथा

पौराणिक कथेनुसार भगवान महादेव 8 मुलांचे पिता होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी:  बुद्धिदाता श्रीगणेश आणि देवांचा सेनापती कार्तिकेय ही भगवान महादेवाची मुले म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहेत. तथापि, महादेवाची इतर मुलेदेखील आहेत ज्यांच्याबद्दल बहुतेकांना माहिती नाही. पौराणिक कथेनुसार भगवान महादेव 8 मुलांचे पिता होते. चला जाणून घेऊया महादेवाच्या बाकी मुलांबद्दल.. अशोक सुंदरी अशोक सुंदरीचा जन्म कार्तिकेयानंतर झाला. अशोक सुंदरीबद्दल तुम्ही गुजरात आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील पौराणिक कथांमध्ये ऐकू शकता. शिवपुराण आणि पद्म पुराणातही अशोक सुंदरीचा उल्लेख आहे. असे म्हटले जाते की पार्वतीने तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी अशोक सुंदरीची निर्मिती केली होती. हे वरदान कल्पवृक्षाने दिले होते जे लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते. महाशिवरात्रीला ग्रहांच्या संयोगामुळे होतोय त्रिग्रही योग, 4 राशींचे भाग्य चमकणार ज्योती दक्षिणेत भगवान शिवासोबत ज्योतीचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की, ज्योतीचा जन्म भगवान शंकराच्या तेजातून झाला होता. ज्योतीचा जन्मही पार्वती मातेशी निगडित असून पार्वतीच्या कपाळातून निघणाऱ्या ठिणगीतून ज्योतीचा जन्म झाला असे म्हटले जाते. ज्योतीला देवीस्वरूपा असेदेखील मानले जाते आणि दक्षिणेकडे तिची पूजा केली जाते. मनसा देवी शिवपुराणात, मनसा देवी ही माता पार्वतीच्या ईर्ष्येशी संबंधित आहे. असे मानले जाते की मनसादेवीचा जन्म महादेवापासून झाला होता परंतु ती पार्वतीची कन्या नव्हती, म्हणून ती ईर्ष्यावान होती. पौराणिक कथेनुसार, सापांची आई कद्रू हिने मूर्ती बनवली होती तेव्हा त्या मूर्तीला महोदवाचा स्पर्श झाला. त्यातून मनसादेवीचा जन्म झाला. ही एक लोकप्रिय कथा आहे की, मनसा सापाच्या इच्छेचा प्रभाव निष्प्रभ करू शकते आणि मंदिरांमध्ये तिची पूजा देवी म्हणून केली जाते, जी सर्पदंश बरे करण्यासाठी ओळखली जाते. अयप्पा पौराणिक कथेनुसार, भगवान अयप्पांचा जन्म शिव आणि विष्णूच्या अपत्याच्या रूपात झाला होता. देवतांना अमृत वाटण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले तेव्हा शिव आणि मोहिनी यांचा पुत्र म्हणून अय्यप्पाचा जन्म झाला. अयप्पा सर्वात शक्तिशाली देवांपैकी एक आहे आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये त्याची पूजा केली जाते. असे म्हणतात की भगवान अय्यप्पा हाच एकमेव देव परशुरामाशी लढू शकतो. 16 की 17फेब्रुवारी विजया एकादशीची नेमकी तिथी कधी? जाणून घ्या पूजाविधी व महत्त्व जालंधर महादेवाला जालंधर नावाचाही पुत्र होता. महादेवाने जालंधरला जन्म दिला, पण नंतर जालंधर त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला. पुराणानुसार जालंधर हा असुराच्या रूपात महोदवाचा एक अंश होता. इंद्राचा पराभव केल्यावर जालंधर तिन्ही लोकांचा देव बनला होता. असे मानले जाते की जालंधरच्या अफाट शक्तीमागे त्याची पत्नी वृंदा होती. तिच्याकडे इतके सामर्थ्य होते की कोणत्याही देवता किंवा देवी त्याला पराभूत करू शकत नव्हते, परंतु त्याचा गर्व नष्ट करण्यासाठी भगवान महादेवाने लीला रचून त्याचा पराभव केला. सुकेश सुकेशला शिवपुत्र म्हणूनही ओळखले जाते. सुकेश अनाथ होता. त्याची आई व्यभिचारी असल्याने त्याच्या जन्मानंतर त्याच्या पालकांनी त्याचा सांभाळ केला नाही आणि सुकेश आपला मुलगा आहे यावर त्याच्या वडिलांचाच विश्वास नव्हता. पुराणानुसार, भगवान शिव आणि देवी पार्वतीने या अनाथ मुलाला पाहिले आणि त्याला संरक्षण दिले होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात