जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Raksha Bandhan 2022: भद्रकाळामुळे आज रक्षाबंधन साजरे करणाऱ्यांनी जाणून घ्या शुभ मुहूर्त, सौभाग्य योग

Raksha Bandhan 2022: भद्रकाळामुळे आज रक्षाबंधन साजरे करणाऱ्यांनी जाणून घ्या शुभ मुहूर्त, सौभाग्य योग

Raksha Bandhan 2022: भद्रकाळामुळे आज रक्षाबंधन साजरे करणाऱ्यांनी जाणून घ्या शुभ मुहूर्त, सौभाग्य योग

यंदा रक्षाबंधनाचा सण भद्रकाळामुळे दोन दिवसांचा झाला आहे. काहीजण आज रक्षाबंधन साजरे करतील, त्यांच्यासाठी द्रुक पंचांगाच्या (Rakhi Muhurat) आधारे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि योग जाणून (Raksha Bandhan) घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑगस्ट : यंदा रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असे दोन दिवस आहे. काल देशाच्या बहुतांश भागात रक्षाबंधन साजरे करण्यात आले, शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावांना राख्या बांधल्या. मात्र, देशाच्या काही भागात आज शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी राखी बांधली जाणार आहे. यंदा रक्षाबंधनाचा सण भद्रकाळामुळे दोन दिवसांचा झाला आहे. काहीजण आज रक्षाबंधन साजरे करतील, त्यांच्यासाठी द्रुक पंचांगाच्या (Rakhi Muhurat) आधारे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि योग जाणून (Raksha Bandhan) घेऊया. 12 ऑगस्टचा शुभ मुहूर्त आणि योग सौभाग्य योग : सकाळी 11:34 पर्यंत शोभन योग : दुसऱ्या दिवशी सकाळी 11.34 ते 07.50 पर्यंत अभिजित मुहूर्त किंवा शुभ वेळ: दुपारी 11:59 ते दुपारी 12.52 अमृत काळ : दुपारी 04.17 ते 05.43 पर्यंत विजय मुहूर्त: दुपारी 02:38 ते 03.31 पर्यंत 12 ऑगस्टची अशुभ वेळ राहुकाल : सकाळी 10.47 ते दुपारी 12.26 पर्यंत पंचक : दुपारी 02.49 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05.49 पर्यंत दुर्मुहूर्त: सकाळी 08.27 ते 09.20, दुपारी 12.52 ते 01.45 12 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त - सकाळपासून 08.27 पर्यंत. सकाळी राखी बांधण्याचा हा शुभ मुहूर्त आहे. दिवसभरात जेव्हाही राखी बांधता तेव्हा अशुभ वेळ वर्ज्य ठेवा. राखी बांधण्याचा मंत्र - येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामभिवध्नामि रक्षे माचल माचलः।। राखी बांधण्याची पद्धत - सकाळी आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाला किंवा आपल्या इष्टदेवाला रक्षासूत्र किंवा राखी बांधा. त्यानंतर भावाला राखी बांधावी. भावाला पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसवा. कापडाने डोके झाकून ठेवा. त्यानंतर चंदन, रोळी, दही आणि अक्षत यांनी तिलक लावावा. हे वाचा -   Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन त्यानंतर उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून मिठाई खाऊ घाला. त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी. भाऊ आणि बहिणींना भेटवस्तू द्या आणि त्यांना नेहमी सुख-दु:खात साथ देण्याचे वचन द्या. हे वाचा -  Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात