मुंबई, 8 सप्टेंबर : हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे. पितृ पक्षाच्या या 15 दिवसांमध्ये आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो आणि पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करतो. असे मानले जाते की या दिवसात आपले पूर्वज आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे या विशेष दिवसांमध्ये काही काम करणे टाळावे, जेणेकरून पितरांच्या आदरात कोणतीही कमतरता भासू नये. जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
पितृ पक्षाच्या दिवसात हे काम करू नका
- पितृपक्षात मांस, मासे, मद्य यांचे सेवन करू नये. या दिवसांत तामसी पदार्थ खाण्याऐवजी सात्त्विक आहार घ्यावा आणि लसूण-कांदा खाण्यापासून दूर राहावे.
- पितृ पक्षाच्या काळात पान आणि तंबाखूसारख्या पदार्थांपासूनही अंतर ठेवावे. तसेच धूम्रपानही नये.
Gemstone: ही 4 रत्न धारण करण्याचे आहेत विशेष फायदे; नशीब बदलण्यास वेळ नाही लागत
- श्राद्ध करणार्या घरातील व्यक्तीनेही ब्रह्मचर्य पाळावे.
- शास्त्रानुसार पितृ पक्षाच्या दिवसात दारात आलेल्या कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा पक्षी यांचा अपमान करू नये. असे मानले जाते की या दिवसांमध्ये तुमचे पूर्वज कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि पशु-पक्ष्याचा आदर करा आणि त्याला खाऊ घाला.
- पितृपक्षात काचेची भांडी वापरणे टाळावे. या दिवसांत तुम्ही स्वत:साठी आणि ब्राह्मणांही पत्रावळीत जेवण केल्यास ते उत्तम मानले जाते.
- पितृ पक्षाच्या दिवसांत घरातील प्रमुख किंवा धार्मिक विधी करणाऱ्या व्यक्तीने आपले केस आणि नखे कापू नयेत. तसेच दाढीही करू नये.
- पितृ पक्षाच्या दिवसांमध्ये भोपळा, काकडी, हरभरा, मसूर, जिरे, मीठ आणि मोहरीच्या हिरव्या भाज्या टाळल्या पाहिजेत.
घरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या
- पितृ पक्षात लग्न, जावळं करणे, साखरपुडा यासारखे कोणतेही शुभ कार्य करू नये. तसेच या दिवसात शुभ कार्यासाठी खरेदीदेखील करू नये.
- श्राद्ध संबंधित विधी संध्याकाळी किंवा रात्री कधीही करू नयेत. ही कामे दिवसा उजेडातच करावीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Pitru paksha, Religion