घरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या

घरातील जुना झाडू फेकताना या चुका टाळा; योग्य दिवस आणि नियम जाणून घ्या

झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, म्हणून झाडूला पाय लावू नये, असे म्हणतात. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो. हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळेच घरात झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात गरिबी येऊ शकते, म्हणून ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया जुना झाडू घराबाहेर फेकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक -

झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, म्हणून झाडूला पाय लावू नये, असे म्हणतात. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते. वास्तु नियमानुसार झाडू घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहते. झाडू वापरून झाल्यानंतर खराब झाला की लोक घराबाहेर फेकून देतात. काहीजण जुने किंवा तुटलेले झाडू घरात ठेवतात. असे मानले जाते की, या दोन्ही गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येते. ज्योतिष शास्त्रामध्ये जुना झाडू फेकण्याचा नियम सांगण्यात आला आहे.

या दिवशी जुना झाडू फेकू नये -

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवार आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही.

जुना झाडू फेकताना या गोष्टी लक्षात ठेवा -

हे देखील लक्षात ठेवा की झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका. जिथे झाड आहे तिथेही झाडू टाकू नये. जुना झाडू फेकण्यासाठी, अशी जागा निवडा जिथे कोणाच्या पायांचा स्पर्श होणार नाही. झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकून द्या, म्हणजे लपवून फेकून द्या. झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

जुना झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस -

जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो. या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता. शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 16, 2022, 10:32 AM IST

ताज्या बातम्या