Gemstone: ही 4 रत्न धारण करण्याचे आहेत विशेष फायदे; नशीब बदलण्यास वेळ नाही लागत

Gemstone: ही 4 रत्न धारण करण्याचे आहेत विशेष फायदे; नशीब बदलण्यास वेळ नाही लागत

भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा अशाच काही रत्नांबद्दल सांगत आहेत, जे धारण केल्याने आपले निद्रित भाग्य चमकू शकते, जाणून घेऊया अशा रत्नांची (Astrology) माहिती.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : रत्नशास्त्रानुसार मानवी जीवनात रत्नांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातही रत्नांचा उल्लेख आहे. कुंडलीतील कमजोर ग्रह आणि त्यांची नकारात्मकता दूर करण्यासाठी रत्न धारण केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने ग्रह आणि कुंडलीनुसार रत्न धारण केले पाहिजे, परंतु कोणतेही रत्न धारण (Gemstone) करण्यापूर्वी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आज भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा अशाच काही रत्नांबद्दल सांगत आहेत, जे धारण केल्याने आपले निद्रित भाग्य चमकू शकते, जाणून घेऊया अशा रत्नांची (Astrology) माहिती.

- नीलम रत्न

रत्न शास्त्रानुसार नीलम हे शनीचे रत्न मानले जाते. हे रत्न धारण करणार्‍याचे नशीब बदलते, असे म्हणतात. परंतु, नीलम धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. हे रत्न धारण केल्यावर लगेचच त्याचा प्रभाव दिसून येतो. या रत्नासोबत माणिक, कोरल आणि पुष्कराज कधीही घालू नयेत.

- पन्ना रत्न

रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पन्ना रत्न बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. व्यवसाय आणि नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी पन्ना घातला जाऊ शकतो. पन्ना रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि बुद्धिमत्ता देखील वाढते. हे रत्न विशेषतः व्यावसायिक लोकांसाठी मानले जाते. मोती, कोरल आणि पुष्कराज कधीही पन्ना रत्नासोबत घालू नये.

- व्याघ्ररत्न

व्याघ्ररत्न देखील नीलम रत्नाप्रमाणे परिधान करणार्‍यावर फार लवकर प्रभाव दाखवते. असे मानले जाते की आर्थिक चणचण भासणाऱ्या लोकांना वाघ्ररत्न धारण केल्याने त्यांच्या त्रासातून मुक्ती मिळते. यासोबतच हे रत्न करिअरमध्येही प्रगती करण्यासाठी उपयोगी आहे.

- जेड स्टोन

विशेषत: विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्यांनी जेड स्टोन घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेड स्टोनमुळे केवळ पैशाचा फायदा होत नाही तर एकाग्रता देखील वाढते. रत्नशास्त्रानुसार, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी जेड स्टोन घातला जाऊ शकतो. हे रत्न धारण केल्याने समाजात पदोन्नती, सन्मान आणि संपत्ती मिळते.

हे वाचा - Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 17, 2022, 9:48 AM IST

ताज्या बातम्या