नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. नवरात्रौत्सवादरम्यान देवीची विशेष पूजा, आराधना केली जाते. या कालावधीत अनेक जण विशेष व्रत अर्थात उपवास करतात. देवीची कृपादृष्टी लाभावी असा त्यामागचा उद्देश असतो; मात्र काही वेळा अनवधानाने उपवास मोडतो. अशा वेळी भाविक चिंताग्रस्त होतात. व्रत अर्थात उपवास मोडला तर नेमकं काय करावं, हे त्यांना माहिती नसतं; पण कोणत्याही कारणामुळे देवीचं व्रत अर्थात उपवास मोडला तर चिंता करण्याची गरज नाही. कारण यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. आज (30 सप्टेंबर) शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस अर्थात पाचवी माळ आहे. या निमित्ताने स्कंदमातेची विधिवत पूजा केली जात आहे. नवरात्रौत्सवात अनेक जण विशेष व्रत किंवा उपवास करतात. एखाद्या वेळी अनवधानाने उपवास मोडतो. त्यामुळे भाविक चिंतेत पडतात; मात्र असं झाल्यास चिंता करण्याची गरज नाही. कारण यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. नवरात्रीत चुकून उपवास मोडला तर चिंता करण्यापेक्षा तातडीने एखाद्या पुजाऱ्याकडे जावं. त्यांच्याकडून दान-धर्माविषयी माहिती घ्यावी आणि त्यानंतर दानधर्म करावा. यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होते.
घराच्या मुख्य चौकटीवर देवी लक्ष्मीचे चरण चिन्ह लावणे म्हणून असतं शुभ
नवरात्रीतल्या एखाद्या दिवशी तुमचा उपवास मोडला, तर त्या दिवशी देवीच्या दर्शनाला जावं. विधीवत पूजा, आरती करावी. तसंच देवी मंत्राचा जप करावा. यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होते आणि व्रतभंगाचा दोष लागत नाही, असं जाणकार सांगतात. नवरात्रीदरम्यान भाविक नऊ दिवस एखादं व्रत, उपवास करतात; मात्र कोणत्याही कारणामुळे किंवा चुकून उपवास मोडला तर घाबरून न जाता दुर्गादेवीची हात जोडून मनोभावे माफी मागावी. व्रत मोडल्यास मंदिरात देवीच्या मूर्तीवर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पदार्थांपासून तयार केलेल्या पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे देवीची कृपादृष्टी प्राप्त होते.
नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी या मंत्रांचा करा पाठ; मनोकामना होतील पूर्ण
नवरात्रीत चुकून उपवास मोडला तर देवी-देवता प्रसन्न व्हाव्यात यासाठी तुम्ही हवन करूनही त्यांची माफी मागू शकता. उपवास मोडल्याने लागलेला दोष यामुळे दूर होतो. त्यासोबत हवन केल्यास तुमचं व्रत पूर्ण होतं, असं मानलं जातं. उपवास मोडल्यास हे उपाय करून तुम्ही देवीची कृपादृष्टी प्राप्त करून घेऊ शकता.