मुंबई, 30 सप्टेंबर : आपल्या घराची तिजोरी नेहमी भरलेली असावी, नोकरी-व्यवसायात नफा होवो आणि घरात सुख-शांती नांदावी, असे प्रत्येकाला वाटते. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानले जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते. एवढेच नाही तर लक्ष्मीच्या पूजेने घराची तिजोरी नेहमी भरलेली असते. असे म्हटले जाते की, जो कोणी देवी लक्ष्मीची खऱ्या भक्तीने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी घरात लक्ष्मीच्या पादुका ठेवणे शुभ आहे. यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि तिची कृपा सदैव राहते. देवी लक्ष्मीचे चरण चिन्हा/पादुकांचे 4 फायदे - ज्योतिषांच्या मते स्वस्तिक, ओम, भगवान गणेश यासह काही शुभ चिन्हे घराच्या मुख्य दरवाजावर लावल्याने देवतांची कृपा घरावर कायम राहते. त्याचप्रमाणे मुख्य गेटवर लक्ष्मीच्या पादुकांची खूण ठेवल्याने सुख-समृद्धी मिळते. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. घरात संपत्तीची कमतरता भासत नाही. म्हणूनच देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे/पादुका लावणे खूप शुभ आहे.
या ठिकाणी ठेवा शुभ चिन्ह शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रवेशद्वारावर देवीच्या मूर्तीसोबत कुबेर यांचे चित्रही लावू शकता. दरवाज्याच्या तळाशी देवी लक्ष्मीचे चरण चिन्ह ठेवणे अत्यंत शुभ असते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. तथापि, काही विशेष गोष्टी देखील लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, घराचा मुख्य दरवाजा रोज स्वच्छ केला पाहिजे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकेल. दार उघडताना-बंद करताना काही आवाज येत असेल तर तो दुरुस्त करा. जेणेकरून कुटुंबात तेढ निर्माण होणार नाही. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)