मुंबई, 27 सप्टेंबर : नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी तसेच मंत्र सिद्धीसाठी महत्त्वाचे मानले जातात. या काळात देवी दुर्गेच्या उपासनेसोबतच विविध मंत्रांचा जप महत्त्वाचा मानला जातो. पंडित इंद्रमणी घनश्याल आपल्याला असे मंत्र आणि त्यांचे महत्त्व सांगणार आहेत, ज्याचा रोज नवरात्रीमध्ये जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासोबतच मुक्ती मिळण्याचे ध्येयही प्राप्त होऊ शकते. दुर्गा सप्तशती मंत्र आणि त्याचा परिणाम - नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या पठणाला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे, ज्याचा प्रत्येक मंत्र वेगवेगळा शुभ परिणाम देतो. सर्वप्रथम आपण दुर्गा सप्तशतीचे मंत्र आणि त्याचे फायदे पाहुया. 1- ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते।। लाभ : या मंत्राचा जप महामारीपासून सुटका करतो. 2- रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान्। त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।। लाभ: हा मंत्र म्हणणाऱ्याचे आजार- दोषांपासून मुक्ती होते. 3- विश्वेश्वरि त्वं परिपासि विश्वं, विश्वात्मिका धारयसीति विश्वम्। विश्वेशवन्द्या भवती भवन्ति, विश्वाश्रया ये त्वयि भक्ति नम्रा:॥ लाभ: हा मंत्र विश्व कल्याणाशी संबंधित आहे. 4- देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि॥ लाभ : हा मंत्र सुख- सौभाग्य-वृद्धिदायक आहे. 5- शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे। सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते॥ लाभ: हा मंत्र दीन-दुबळी अवस्था बदलणारा आहे. 6- देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोखिलस्य। प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य।। लाभ: हा मंत्र दु:ख-संकटांचा नाश करणारा आहे. इतर मंत्र 1. देवी दुर्गेचा नवाक्षर मंत्र: ‘ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ लाभ: हा मंत्र 9 ग्रहांवर नियंत्रण ठेवणारा आणि साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारा सिद्ध मंत्र आहे. 2. दुर्गा मंत्र: ऊं ह्रीं दुं दुर्गाय नम:। लाभ: हा मंत्रही सगळी सुखे, समृद्धी-सिद्धी प्रदान करणारा आहे. 3. देवी बगुलामुखी मंत्र -ऊं ह्रीं बगुलामुखी सर्व दुष्टानांम वाचम् मुखम् पद्म स्तंभय जिह्वाम् किल्य किल्य ह्रीं ऊं स्वाहा। लाभ: हा मंत्र तांत्रिक सिद्धी प्रदान करणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.