मराठी बातम्या /बातम्या /religion /

टेंभीनाक्याची दुर्गेश्वरी : 46 वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी 'या' कारणामुळे सुरू केला नवरात्रोत्सव, Video

टेंभीनाक्याची दुर्गेश्वरी : 46 वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी 'या' कारणामुळे सुरू केला नवरात्रोत्सव, Video

Thane: 1978 साली शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका या ठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. त्यामागील कारण देखील खास आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर : देशभरात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे आणि भाविकांमध्ये ही मोठा उत्साह पाहायला मिळतं आहे. कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्वसारखाच यंदा नवरात्रोत्सव देखील निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारलेला पाहिला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील दुर्गेश्वरी  देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका नवरात्रौत्सवाची सुरुवात केली होती. चला तर मग जाणून घेऊया कसा सुरु झाला आनंद दिघे यांचा नवरात्र उत्सव, काय आहे या मागचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

कशी झाली सुरूवात?

1978 साली शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. आनंद दिघे यांना साक्षात्कार झाल्यानंतर ही मूर्ती बनवण्यात आली. त्यानंतर थोड्याच काळात हा उत्सव  ठाणे शहरापूरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाला. येथील दुर्गेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या देवीला टेंभी नाक्याची देवी किंवा दुर्गेश्वरी म्हणून संबोधले जाते. या वर्षी देवीची स्थापना मंदिराचे डेकोरेशन बनवून करण्यात आली आहे. गोल घुमटा खाली देवी. पुरातन मंदिरामध्ये आढळणारा सभामंडप असा देखावा आहे.

कोरोना काळात भाविकांना देवीचे दर्शन मिळाले नाही म्हणून या वर्षी अनेक भाविक उत्साहाने, हुरहूरीने दर्शनासाठी येताहेत. तसेच या वर्षीचा उत्सव जरा वेगळाच असल्याच येथील सदस्य संतोष घुले यांनी म्हटलं आहे.

मूर्तीचे वैशिष्ट्य काय आहे?

दरवर्षी हजारो महिला या देवीची ओटी भरण्यासाठी येथे येतात. बोलकी, सोज्वळ, स्मित हास्यमुद्रा असलेल्या या मूर्तीचे डोळे पाहून मन प्रसन्न होते. धर्मवीर . या देवीची स्थापना आणि पूजा मुहूर्तावर होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळवा पासून ते टेंभी नाक्यापर्यंत भव्य मिरवणूक निघते. या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. एक स्त्री ज्या पद्धतीने शृंगार करते तसेच बंद खोलीत मूर्तीचा शृंगार केला जातो. तेथे मूर्तिकार आणि त्यांचे नेमलेले सहकारी यांच्याशिवाय दुसरे कुणीही नसते.

नवरात्रीचा तिसरा दिवस, चंद्रघंटा देवीची अख्यायिका आणि पूजाविधी, Video

मूर्तीकार कोण आहेत?

ही मूर्ती घडवण्यासाठी कळवा येथील शिळकर कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. पारंपरिक व्यावसायिक मूर्तीकार गणपत नत्थु शिळकर यांनी सर्वप्रथम ही मूर्ती तयार केली. पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विनोद शिळकर आणि दीपक शिळकर यानी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शिळकर कुटुंबाचं ही मूर्ती बनवण्याच 46 वे वर्ष आहे.

गरब्यासाठी घ्या स्वस्त आणि मस्त ड्रेस, दांडिया नाईट जाईल झकास Video

सामाजिक आणि सांस्कृतीक उपक्रम

आरोग्य शिबीर, ब्लड डोनेशन कॅम्प असे अनेक सामाजिक उपक्रम येथे राबवले जातात. तसेच भोंडला, भजन, देवीचे स्त्री सूक्त आवर्तन या प्रकारचे परंपरेने चालत आलेले कार्यक्रम होतात.

गुगल मॅप वरून साभार

पत्ता - तलावपाळी, टेंभी नका, ठाणे

First published:

Tags: Culture and tradition, Navratri, Thane