मुंबई, 27 सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवार म्हणजेच 26 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. नवरात्र म्हटली की, एक वेगळाच उत्साह संचारलेला पाहिला मिळतो. एकीकडे आदिशक्तीच्या भक्तीमय वातावरणात सगळे भारावलेले दिसतात, तर दूसरीकडे तरूणाईमध्ये दांडिया आणि गरबाचा फिवर चढलेला दिसतो. अशातच दांडिया आणि गरबा प्रेमींना यावर्षी आपण इतरांपेक्षा जरा हटके दिसावं असं वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी वेगवेगळे ड्रेस घ्यावे लागतात. हे ड्रेस खरेदी करण्यासाठी पैसे जास्त लागतात पण याचं पैस्याची बचत करण्यासाठी तुम्ही भाड्याने दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी ड्रेस घेऊ शकता. दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुंबईतील कळवा भागातील कलाईवाणी कॉश्च्युमचे सागर अन्नदाते यांनी भाड्याने ड्रेस घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या दुकानात तुम्हाला तुमच्या मनपसंतीप्रमाणे गुजराथी, मारवाडी, कच्छी, महाराष्ट्रीयन आणि चालू फॅशन ट्रेंड नुसार कपडे डिझाईन करून सुद्धा मिळण्याची सोय आहे. त्यामुळे दांडिया आणि गरबा खेळणाऱ्यासाठी एक चांगला पर्याय मुंबईतल्या मुंबईत उपलब्ध झाला आहे. हेही वाचा :
Navratri : दांडियामध्ये इतरांवर प्रभाव टाकायचाय? फॉलो करा सोप्या टिप्स Video मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दांडिया आणि गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेता आला नसल्यामुळे यंदा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच दांडिया आणि गरबा खेळण्याच्या उत्साहात आहेत. त्यामुळे या वर्षी घेरदार लेहेंगा व केडियाचीच मागणी जास्त असल्याचे कलाईवाणी कॉश्च्युमचे सागर अन्नदाते यांनी सांगितले. कलाईवाणी मध्ये कुठले ड्रेस आणि दागिने उपलब्ध आहेत? चनिया चोळी, केडिया, महाराष्ट्रीयन साड्यांचे विविध प्रकार फ्युजन ट्रेंड मुळे या वर्षी भाडेतत्वावर उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिडाइज ज्वेलरी आरश्याच्या ड्रेस वर घालण्यासाठी आरश्यांची ज्वेलरी तसेच महाराष्ट्रीयन साडी वर घालायला नाकातल्या नथ पासून तर पायातल्या पैंजनापर्यंत उपलब्ध आहेत. हेही वाचा :
Navratri 2022: नवरात्रीत न थकता गरबा खेळायचाय? निरोगी शरीर अन् सौंदर्यासाठी फॉलो करा खास टिप्स
कलाईवाणी दुकान कुठे आहे? कळवा स्थानकापासून 10-15 मिनिटे अंतरावर हे दुकान आहे. खारेगाव रस्त्यावरून जाताना दत्तवाडी इथे रस्त्यालगत हे दुकान आहे. संपर्क क्रमांक - 88888 20222
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.