पुणे, 28 सप्टेंबर : नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवीचं महत्त्व आहे. आज आश्विन शुद्ध तृतीया (28 सप्टेंबर) नवरात्रीचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी चंद्रघंटा देवीची उपासना केली जाते. या देवीच्या उपासनेनं भय दूर होते, तसंच जन्म कुंडलीतील मंगळ मजबूत होतो, असे मानले जाते. ज्यांचा मंगळ कमजोर आहे, त्यांनी या देवीची उपासना करावी, अशी माहिती पंडित वसंत गाडगीळ यांनी दिली आहे. संकट निवारक देवी दुर्गामातेच्या तिसऱ्या रूपातील या देवीच्या कपाळाव अर्धचंद्र असल्यानं या देवीला चंद्रघंटा देवी असे नाव आहे. ही देवी वाघावर आरूढ आहे. त्याचबरोबर दशभुजा आहे. त्यापैकी चार हातांमध्ये त्रिशूल, गदा, तलवार आणि कमंडलू असून पाचव्या हातामध्ये अभय मुद्रा आहे. देवीचे स्वरूप अतिशय शांततामय आणि कल्याणकारी आहे. तसेच सुवर्णसारखा चकचकीत वर्ण आहे. शस्त्रं आणि अस्त्र धारण करणारी देवीची मुद्रा ही युद्धाची आहे. औरंगाबादच्या ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेला सुरूवात, 350 वर्षांची आहे परंपरा चंद्रघंटा देवीचे वाहन हे सिंह आहे. युद्धासाठी सज्ज असलेल्या या देवीचा उपासक सिंहासारखा निर्भय आणि पराक्रमी होतो असं मानलं जातं. त्याचबरोबर या देवीचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे. त्यामुळे देवीच्या उपासकामध्ये वीरता आणि निर्भयतेबरोबरच सौम्यतेचाही विकास होतो. संकट निवारणासाठी देखील या देवीची पूजा केली जाते. त्या दिवशी साधकाच्या मनाचा ‘मणिपूर चक्रा’मध्ये प्रवेश होतो, असे मानले जाते.
या देवी सर्वभूतेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ या मंत्राने या देवीची पूजा करावी, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले आहे. “पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥ हा मंत्र देखील या पूजेच्या दरम्यान म्हणावा. नवरत्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म झाल्यावर देवीचं पूजन करावं. या देवीच्या पूजनामुळे उपासकांना यश, किर्ती आणि मानसन्मान मिळतो, असे मानले जाते.