जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Navratri : पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची प्रार्थना, पाहा पूजाविधी आणि महत्त्व! Video

Navratri : पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची प्रार्थना, पाहा पूजाविधी आणि महत्त्व! Video

Navratri : पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची प्रार्थना, पाहा पूजाविधी आणि महत्त्व! Video

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नवदुर्गांमधील एका देवीची पूजा केली जाते. पाचव्या दिवशी स्कंद माता देवीची पूजा करतात.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 30 सप्टेंबर :  आज (30 सप्टेंबर) नवरात्रीचा पाचवा दिवस. अश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी म्हणूनही आजचा दिवस ओळखला जातो.  नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नवदुर्गांमधील एका देवीची पूजा केली जाते. पाचव्या दिवशी स्कंद माता देवीची पूजा करतात. स्कंद म्हणजे कार्तिकीकुमार. श्री गणेशाचे बंधू कुमार कार्तिकेय. कार्तिक स्वामींची आई म्हणून स्कंद माता असे या देवीचे नाव आहे. स्कंदमाता देवीचं महत्त्व आणि या देवीची पूजा कशी करावी याची विशेष माहिती पंडित वसंत गाडगीळ यांनी दिली आहे. सिंहासनगता नित्यं पद्माश्रित- कर-द्वया। शुभदा अस्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।। स्कंदमाता आणि स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेले चतुर्भूजा देवी आहे. सिंह हे देवीचे वाहन आहे. डाव्या उजव्या वरच्या हातात कमळ तर खालचा डावा हात वर मुद्रा आहे.या देवीचा रंग पूर्ण शुभ्र आहे. काही ठिकाणी ही पद्मासनेत आहे. अनेक योगसाधक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या देवीची उपासना करतात. स्कंदमाता देवीची कथा पौराणिक कथेनुसार तरकासुर या राक्षसाचा अत्याचार वाढला तेव्हा सर्व देव, गंधर्व, ऋषी-मुनी आणि मनुष्य यांनी तरकासुरापासून मुक्ती मिळावी यासाठी पार्वती मातेची प्रार्थना केली. त्यानंतर आदिशक्तीचा मुलगा कार्तिकीकुमार यांनी तरकासुराचा वध करत सर्वांची या त्रासातून मुक्ती केली.

‘स्कंदमातेला आजच्या दिवशी  नैवद्य म्हणून केळीचा नैवद्य अर्पण केला जातो. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते. ज्यांना गुरू ग्रहांचे शुभ फळ प्राप्त करायचे आहे त्यांच्यासाठी देखील केळीचा नैवेद्य अत्यंत शुभ मानला जातो,’ अशी माहिती पंडित गाडगीळ यांनी दिली आहे. ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, जाणून घ्या पूजेची पद्धत ‘स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो,’ अशी श्रद्ध असल्याचंही गाडगीळ यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात