विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 17 फेब्रुवारी: शंभू महादेवाचा संबंध शून्यतेशी, अगम्यतेशी, गूढतेशी जोडला जातो. त्यामुळे बरीच प्राचीन शिवालयं मानवी वस्तीपासून दूर नदी किनारी, डोंगर कपारीत, गर्द वनराईत आढळून येतात. नागपुरात देखील असेच एक पौराणिक शिव मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदिर एका बावडीमध्ये असून ते वर्षातून एकदा म्हणजे महाशिवरात्रीलाच खुले असते.
पुरातन बावडीत मंदिर नागपूर नगरीच्या निर्मितीला गोंड आणि भोसले काळातील जाज्वल्य इतिहासाची किनार आहे. त्यामुळे अनेक शिव मंदिरे याच काळात निर्माण झाली आहे. शेकडो वर्षा आधी निर्माण झालेली ही प्राचीन शिव मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण पुरातन शिवमंदिर नागपुरातील नंदनवन भागात स्थित आहे. विशेष म्हणजे हे शिवमंदिर पुरातन बावडी मध्ये आहे. महाशिवरात्रीला वर्षातून केवळ एकदाच भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. Mahashivratri 2023 : नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती, पाहा तिथं कसा होणार उत्सव? Video 30-40 पायऱ्या उतरुन मंदिरात प्रवेश नंदनवन येथील शिव मंदिर भुयारी विहिरीत अर्थात बावडीत वसलेले आहे. या मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. 30-40 पायऱ्या उतरून आपण थेट विहिरीत उतरू शकतो. येथे एक शिवलिंग असून हे मंदिर केवळ महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी खुले असते. तेव्हा लाखो शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात. श्री हनुमान मंदिर पंचकमेटीद्वारे मागील 50 वर्ष पासून या मंदिराची देखभाल केली जाते. इथे चक्क शिवभक्त राक्षसाची करतात पूजा, पाहा शंभू महादेव मंदिराची आगळी वेगळी आख्यायिका, Video बावडीचे अस्तित्व धोक्यात शिव मंदिर असलेली बावडी, त्यातील अजोड बांधणी, वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असून नागपूर नगरीच्या ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वात अधिक भर घालणारी आहे. मात्र अलीकडच्या काळात काळानुरूप या पुरातन बावडीकडे दुर्लक्ष झाले आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या या बावडीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. तिच्या सौंदर्यासोबतच पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व जपले जावे ही इच्छा सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. तर हा अमूल्य वारसा जपला जावा त्यासाठी सरकारने मदत करावी, अशी भावना श्री हनुमान मंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष अनिल सरवे यांनी व्यक्त केली.

)







