विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 18 फेब्रुवारी : महाशिवरात्रीच्या मंगलपर्वानिमित्त देशभारतील सर्व शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजली आहेत.
नागपूर
शहरातील नंदनवन भागात असलेली 51 फुटी उभी शंकराची मूर्ती ही केवळ नागपुरातीलचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उंच शंकराची मूर्ती आहे.
महाशिवारात्रीच्या
निमित्तानं या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. त्याचबरोबर हे मंदिर हे अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. यंदा काय आकर्षण? आदि आणि अनंताची महादेवता अशी महाशिवाची ओळख आहे. नागपूर शहराला गोंड राजवटीसह भोसलेकालिन प्राचीन इतिहास लाभला आहे. या शहरात देखील अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक शिव मंदिरं आहेत. त्याचबरोबर एक पुरातन शिव मंदिर शहराच्या नंदनवन भागात आहे. याच मंदिराच्या शेजारी 51 फूट उभ्या स्वरूपाची भव्य अशी विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उंच मूर्ती असल्याचं मानलं जातं. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होते. लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात.
महाशिवरात्रीला भांग घेण्याचा प्लॅन आहे? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
नागपुरातूनच नव्हे तर नागपुराच्या बाहेरून देखील भाविक इथं दर्शनासाठी येतात. आम्ही दरवर्षी लघु रुद्राभिषेकचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व समाजतील लोक येथे येऊन सक्रिय सहभाग नोंदवत असतात. यंदा आम्ही 251 विवाहित जोडप्यांचे लक्ष रुद्राभिषेकाचे ठेवले आहे.
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी घ्या नागपुरातील प्राचीन मंदिरांचं दर्शन
ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी उभ्या स्वरूपाची शंकराची मूर्ती असल्याने विशेष आकर्षण आहे.भाविकांनी देखील दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मनारायण सेवा समितीचे डॉ. निलेश गायधने यांनी व्यक्त केले आहे.
गुगल मॅपवरून साभार