मराठी बातम्या /बातम्या /religion /

Maghi ganpati: रवि योगात या मुहूर्तावर करा गणेश जयंतीची पूजा, संपतील विघ्न-संकटे

Maghi ganpati: रवि योगात या मुहूर्तावर करा गणेश जयंतीची पूजा, संपतील विघ्न-संकटे

गणेश जयंती पूजा मुहूर्त

गणेश जयंती पूजा मुहूर्त

यंदा गणेश जयंतीला तीन योग जुळून आले आहेत. परिघ योग सकाळपासूनच असेल, जो संध्याकाळी 06:16 पर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरू होईल. या दिवशी रवि योग सकाळी 07.13 ते रात्री 08.05 पर्यंत असेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 24 जानेवारी : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद तील कुंड चतुर्थी असेही म्हणतात. गणेश जयंती दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येते. भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि बाप्पाला आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात. मनोभावे केलेल्या भक्तीनं बाप्पा आनंदी होतात, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि विघ्न हरतात, अशी श्रद्धा आहे.

गणेश जयंती 2023

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा सांगतात की, यंदा गणेश जयंतीला रवियोग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत आहेत. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारीला दुपारी 03.22 वाजता सुरू होत आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी दुपारी 12.34 वा. उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती बुधवार, 25 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. बुधवार हा नियमित गणेश पूजनाचाही दिवस असतो.

गणेश जयंती 2023 पूजेची वेळ

25 जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते दुपारी 12.34 पर्यंत आहे. या दिवशी तुम्हाला गणेश पूजेसाठी एक तासापेक्षा जास्त शुभ मुहूर्त मिळेल.

गणेश जयंतीला चंद्रदर्शन नको -

गणेश जयंती ही विनायक चतुर्थी असल्याने या दिवशी चंद्रदर्शनास मनाई आहे. या दिवशी चंद्र पाहिल्यानं खोटा कलंक लागतो, असे मानले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी 09.54 ते रात्री 09.55 पर्यंत चंद्रदर्शन निषिद्ध आहे. यामुळे दिवसा गणेशाची पूजा करतात.

गणेश जयंती 2023 तीन योग

यंदा गणेश जयंतीला तीन योग जुळून आले आहेत. परिघ योग सकाळपासूनच असेल, जो संध्याकाळी 06:16 पर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरू होईल. या दिवशी रवि योग सकाळी 07.13 ते रात्री 08.05 पर्यंत असेल.

गणेश जयंतीला भद्रकाळ आणि पंचकही

गणेश जयंतीच्या दिवशी भद्रकाळ आणि पंचकही असते. 25 जानेवारी रोजी पंचक संपूर्ण दिवस आहे आणि भद्रकाळ सकाळी 07:13 ते दुपारी 12:34 पर्यंत आहे. मात्र, यामध्ये पूजेवर कोणतेही बंधन नाही.

गणेश जयंतीचे महत्त्व

शिवपुराणानुसार, माता पार्वतीने आपल्या उबटनापासून एका मुलाची मूर्ती बनवून तिला पवित्र केलं होतं, ज्यातून गणेशाचा जन्म झाला. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थी तिथी होता. त्यामुळे दरवर्षी या तारखेला गणेश जयंती साजरी केली जाते. या तिथीला गणपतीचा जन्मदिवस असल्यानं विधिपूर्वक पूजा करून बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा.

हे वाचा - माघी गणेशोत्सव: गणपतीला साकडं घालताना राशीनुसार या अचूक मंत्राचा करा जप

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Maghi Ganesh Jayanti, Religion