मुंबई, 24 जानेवारी : विघ्नहर्ता श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी बुधवारी आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला प्रसन्न करून आपण आपल्या आयुष्यातील संकटे दूर करू शकता. या दिवशी पूजेच्या वेळी गणेशाच्या प्रभावी मंत्रांचा जप करावा. 12 राशींसाठी गणेशाचे मंत्र दिले आहेत, जे खूप प्रभावी मानले जातात. गणपतीची पूजा करताना, गणेशाला साकडं घालताना तुमच्या राशीनुसार अचूक मंत्राचा जप केल्यास विघ्नहर्त्या बाप्पाची कृपा प्राप्त होते. यामुळे जीवनात प्रगती होते आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की, गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या डावीकडे वळलेली सोंड असलेल्या मूर्तीची पूजा करावी. या स्थितीतील गणपती लवकर प्रसन्न होईल. गणेशाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा लाल चंदनाचा माळेचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ पूजेवेळी राशीनुसार गणेशाचे कोणते प्रभावी मंत्र म्हणावेत. राशीनुसार गणेश मंत्र मेष: ओम वक्रतुण्डाय हूं वृषभ: ओम हीं ग्रीं हीं मिथुन: ओम गं गणपतये नमः कर्क: ओम वक्रतुण्डाय हूं सिंह: ओम सुमंगलाये नम: कन्या: ओम चिंतामण्ये नम: तूळ: ओम वक्रतुण्डाय नम: वृश्चिक: ओम नमो भगवते गजाननाय धनु: ओम गं गणपते मंत्र मकर: ओम गं नम: कुंभ: ओम गण मुक्तये फट् मीन: ओम गं गणपतये नमः गणेश मंत्र जप पद्धत - गणेशाच्या मंत्राचा जप करण्यापूर्वी बाप्पाच्या मूर्तीचा गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर वस्त्र, चंदन, फुले, फळे, हार, दुर्वा, अक्षत, नारळ, नैवेद्य, धूप, दिवा इत्यादींनी गणेशाची पूजा करावी. मोदक किंवा लाडू अर्पण करा.
यानंतर शांत चित्ताने कुश आसनावर किंवा इतर कोणत्याही आसनावर बसावे. मंत्रजप करण्यापूर्वी मन स्थिर ठेवावे. गणपती बाप्पाचे ध्यान करून तुमच्या राशीसाठी दिलेल्या गणेश मंत्राचा जप करा. मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्राचा नीट उच्चार आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे. गणेश जयंती 2023 पूजा मुहूर्त - सकाळी 11.29 ते दुपारी 12.34 पर्यंत शुभ वेळ हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)