मुंबई, 30 जून : आपली प्रेयसी, बायको, पार्टनर रोमँटिक असावी असं अनेक पुरुषांना वाटतं. आता तुमची पार्टनर रोमँटिक आहे की नाही हे तिच्या राशीवरून तुम्हाला कळू शकेल. इतकंच नाही तर कोणत्या राशींच्या मुली लवकर प्रेमात पडतात आणि कोणत्या राशींच्या मुलींना प्रेमात पडायला वेळ लागतो, हेही कळतं. ज्योतिषशास्त्रानुसार काही इंटरेस्टिंग माहिती पाहुया. प्रत्येकाची रोमान्सची व्याख्या वेगवेगळी असते. काहीजणांना आपलं प्रेम शांतपणे व्यक्त करायला आवडतं तर काहीजणांना मात्र आपलं प्रेम अगदी वेगळ्या पद्धतीनी गाजावाजा करत व्यक्त करायला आवडतं. तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं हे विज्ञान आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अगदी नीट स्पष्ट करुन सांगितलं आहे. आता बघूयात कोणत्या राशीचे लोक जास्त रोमँटिक असतात आणि कोणत्या राशीचे कमी रोमँटिक… सिंह या राशीच्या मुली अत्यंत उत्कटतेने प्रेम करतात. आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करतो हे जगाला दाखवायला त्यांना खूप आवडतं. त्या प्रेमळ तर असतातच पण रोमँटिकही असतात. खरं तर त्या किती रोमँटिक आहेत याची त्यांना स्वत:लाच कल्पना नसते.
तूळ या राशीच्या मुली त्यांचं जोडीदारावरंचं प्रेम व्यक्त करायला कधीही लाजत नाहीत. त्यांना गुलाबाची फुलं प्रचंड आवडतात. या मुली त्यांच्या जोडीदाराबरोबर असोत किंवा नसोत, त्या कायमच रोमँटिक मूडमध्ये असतात. मीन ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या मुली अशा रिलेशनशीपबद्दल प्रचंड आशावादी असतात. त्यांना त्यांचं प्रेम म्हणजे एखादं सुंदरं स्वप्नं वाटत असतं. या राशीच्या मुली आणि मुलं दोघांनाही रोमँटिक वस्तू, गोष्टी आवडतात आणि आपण आपल्या प्रेमळ व्यक्तीसाठी सगळ्यांत जास्त रोमँटिक पार्टनर असावं अशी त्यांची इच्छा असते. त्याशिवाय त्यांना त्यांच्या प्रेम आणि रोमान्सने भरलेल्या काल्पनिक जगात कायम रममाण व्हायला आवडतं. ते कायम सगळ्यात जास्त रोमँटिक जोडीदाराच्या शोधात असतात. तुमची आहे का ही रास, होऊ शकतो धनवर्षा; सगळीकडून आनंदवार्ता कानी पडतील कर्क ही राशी सर्व राशींमधील सगळ्यात जास्त संवेदनशील रास आहे. त्यामुळेच या राशीच्या लोकांचं लक्ष अगदी वेगळ्या भावनिक पैलूकडे असतं. फक्त रोमँटिक भावनाच व्यक्त करणं या राशीच्या मुलींसाठी पुरेसं नसतं तर त्यांचा पार्टनर रोमँटिक असावा असं त्यांना वाटतं. आणि जर असं खरंच झालं तर या राशीच्या मुली आणखी रोमँटिक होतात. वृश्चिक या राशीच्या मुली काहीशा गूढ व्यक्तिमत्वाच्या आणि त्यांच्याच विश्वात राहणाऱ्या असतात. पण आपल्याला या जगातून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी हवं आहे याची त्यांना जाणीव असते. खरं तर त्यांचा भावनिक आणि संवेदनशील स्वभाव समजून घेईल अशा जोडीदाराची त्यांना प्रचंड गरज असते. जेव्हा त्या योग्य जोडीदाराबरोबर असतात तेव्हा त्या मीन किंवा सिंह राशीच्या मुलींप्रमाणे भरपूर रोमँटिक होऊ शकतात. वृषभ आपल्या जोडीदाराला भावनिकरित्या आनंदी आणि सुखात ठेवणं या पलीकडे वृषभ राशींच्या मुलींना दुसरं काहीही नको असतं. रिलेशनशीपमध्ये वचनबद्ध राहण्यासाठी किंवा अगदी सीरियस रिलेशनशीप राहावी यासाठी त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत भावनिकरित्या जोडलं जाणं महत्त्वाचं वाटतं. जुलैमध्ये अभद्र गुरु-चांडाळ योग! संपूर्ण महिनाभर या राशींना जपून राहावं लागणार मेष या राशीच्या व्यक्ती प्रेमात अगदी निश्चिंत आणि प्रेमाबाबत सहज विचार करणाऱ्या असतात. त्यामुळेच अगदी आपल्या खास व्यक्तींसाठीही त्या फार कष्ट घेत नाहीत. त्यांच्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी रोमँटिक होण्याचीही ते पर्वा करत नाहीत. धनु या राशीच्या मुली प्रचंड आत्ममग्न असतात. पण तरीही त्यांना रोमँटिक गोष्टी करायला खूप आवडतं. त्यांना बाहेर फिरायला जाणं, मजा करणं आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी करायला खूप आवडतं. मात्र रिलेशनशीपसाठी वेळ काढणं आणि रोमँटिक मूड बनवणं या गोष्टी मात्र त्यांच्यासाठी खूप अवघड असतात. कन्या कन्या राशीच्या मुली कायम रोमँटिक असतात असं नाही. उलट त्यांना आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायला आवडतं. कधीतरी कन्या राशीच्या मुली त्यांच्या पार्टनरची स्तुती करतात आणि त्यांना डिनर डेटला घेऊन जातात आणि त्यांचं प्रेम व्यक्त करतात. पण असं अगदी कधीतरी होतं. Rashichakra: केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं मकर या राशीच्या मुली स्वभावत:च आनंदी असतात. अगदी बिझी शेड्युल किंवा कामात व्यस्त असूनही त्या त्यांच्या जोदीरासाठी आवर्जून वेळ काढतातच. त्यांना अगदी जुन्या जमान्यातला रोमान्स खूप आवडतो. मिठ्या मारणं किंवा किस करणंही या राशीच्या मुलींना खूप आवडतं. मिथुन रोमान्स हा शब्द मिथुन राशीच्या मुलींच्या शब्दकोशातच नाही. आपल्याबद्दल दुसरी व्यक्ती काय विचार करत असेल याबद्दल त्या सतत विचार करतात. त्यामुळे त्या रोमान्स करायलाही घाबरतात. रोमान्सची त्यांना भीतीच वाटते. या जन्मतारखा असलेल्यांनी लग्नाचा निर्णय जपून घ्या; खूप गोष्टीत साम्य दिसलं तरी.. कुंभ रोमँटिक होणं म्हणजे बौद्धिक चालना देणारं संभाषण, संवाद असेल तर यांच्यासाठी तोच रोमान्स असतो. अशा व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराबरोबर रोमँटिक होण्यासाठी रोमँटिक वातावरण, रोमँटिक बोलणं अशा गोष्टी किंवा भावना व्यक्त करायला आवडत नाहीत. आता यावरून तुम्हीच ठरवा तुम्ही किंवा तुमचा जोडीदार किती रोमँटिक आहात ते.