मराठी बातम्या /बातम्या /religion /

Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या

Locket Tips : लॉकेटचे असे तोटे पण असतात; गळ्यात घालताना हे नियम एकदा समजून घ्या

कोणत्याही प्रकारचे लॉकेट गळ्यात घालण्यापूर्वी त्याविषयीचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून लॉकेट घालण्याचे फायदे आणि तोटे जाणून (Locket Vastu Tips) घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 ऑगस्ट : फॅशनच्या आजच्या या युगात लोक लॉकेट, अंगठ्या यासह अनेक गोष्टी घालतात. काही देव-देवतांचे लॉकेट घालतात, तर काही क्रॉस, गिटार, प्लसचे लॉकेट घालतात. त्याचबरोबर काही लोक रुद्राक्ष, स्फटिकाच्या माळा घालतात. जरी लोक ते फॅशनसाठी घालत असले तरी वास्तुशास्त्रात त्याचे महत्त्व सांगितले आहे. याचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे लॉकेट गळ्यात घालण्यापूर्वी त्याविषयीचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून लॉकेट घालण्याचे फायदे आणि तोटे जाणून (Locket Vastu Tips) घेऊया.

अशी लॉकेट्स शुभ असतात -

वास्तुशास्त्रानुसार चांदी, पितळ आणि तांब्यापासून बनवलेले लॉकेट घालणे शुभ मानले जाते. तेही परिधान करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये नियम दिलेले आहेत. प्रत्येक धातूचा एक ग्रह नक्षत्र असतो. त्या ग्रह राशीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. कोणताही धातू विशेष काळजी घेतल्याशिवाय परिधान करू नये, अन्यथा आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

देवाचे लॉकेट घालणे कितपत योग्य?

ज्योतिषशास्त्रानुसार, शरीरावर देवी-देवतांचे लॉकेट घालणे चांगले मानले जात नाही. शास्त्रानुसार आपले शरीर नेहमी स्वच्छ राहत नसते. अंगावर घाण जमा होत असते. आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय धुतो. मात्र, हात न धुता लॉकेटला स्पर्श करतो, हा देवाचा अपमान मानला जातो. यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. नकारात्मक शक्ती घरावर वर्चस्व गाजवू शकतात. म्हणून देवाचे लॉकेट घालू नये.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

तुम्ही हे लॉकेट घालू शकता -

ज्योतिषशास्त्रानुसार देवतांचे प्रतीक म्हणून यंत्रासह लॉकेट घालणे शुभ मानले जाते. हे लॉकेट धारण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि वास्तुदोषही दूर होतात. असे म्हणतात की यंत्राचे लॉकेट धारण केल्याने परमेश्वराची कृपा राहते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu