जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vat Purnima 2023: वटपौर्णिमेची विधीवत पूजा कशी करावी? पूजेच्या ताटात काय साहित्य असावं

Vat Purnima 2023: वटपौर्णिमेची विधीवत पूजा कशी करावी? पूजेच्या ताटात काय साहित्य असावं

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी?

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी?

ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाची पूजा केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जून : वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाची पूजा केली जाते. स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून कुटुंबाला व पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला मनोकामना करतात आणि वटपौर्णिमेच्या शुभेच्छा एकमेंकाना देतात. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असल्याचे सांगितले जाते. तसेच वाचा वटपौर्णिमेसाठी खास मराठी उखाणे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ताटात लागणारे साहित्य- हळद- कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पाच प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजा विधी - सकाळी वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. सकाळची कामे उरकल्यानंतर सुवासिंनीनी सौभाग्यलंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र जमावं.

News18लोकमत
News18लोकमत

षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. बांबूच्या दोन टोपल्या घ्या, एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा. माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दिवा, अक्षत, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे. माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा. पंचामृत नेवैद्य म्हणून दाखवा. यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान-दक्षिणा द्यावी. पूजेनंतर महिलां एकमेकींना आंब्याचे वाणही देतात. या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. प्रार्थना वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया, मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करतात. पहिल्यांदाच वट सावित्रीची पूजा करणार आहात? सुहासिनींनी या गोष्टी लक्षात ठेवा पूजा मंत्र -  सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी| तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्| अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते | अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। अशीही प्रार्थना केली जाते. नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात