मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Vat Purnima Ukhane Marathi : वटपौर्णिमेसाठी सुंदर उखाणे, मैत्रीणीही करतील तुमचं कौतुक
News18 Lokmat | May 11, 2023, 15:46 IST | Mumbai, India

Vat Purnima Ukhane Marathi : वटपौर्णिमेसाठी सुंदर उखाणे, मैत्रीणीही करतील तुमचं कौतुक

वटपौर्णिमेसाठी काही खास उखाणे, लेटेस्ट उखाणे कुटुंबीय आणि मैत्रिणींसमोर घ्या आणि भरभरुन कौतुक मिळवा

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास… __रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास
1/ 7

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास… __रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

2/ 7

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात____रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ

3/ 7

तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास____रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास

4/ 7

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान ____रावांसोबत, मी संसार करीन छान

5/ 7

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य ____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

6/ 7

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका, _____ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका

7/ 7

वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा, _____ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा. मग तुम्हीही येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी हे खास वटपौर्णिमा उखाणे नक्की घ्या. 

Published by:Devika Shinde
First published:May 11, 2023, 15:46 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स