advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा

नवरा-बायकोच्या नात्यावर होईल परिणाम, वटपौर्णिमेला या गोष्टी जाणीवपूर्वक टाळा

पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्यतेने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल, असे वरदानही दिल्याचे मानले जाते. म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वट सावित्री आहे.

01
वट सावित्री व्रताच्या दिवशी हे काम करू नये - - वट सावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका, यामुळे अशुभ परिणाम मिळतात. महिलांनी काळे-निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही. या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करा. काळ्या बांगड्या चुकूनही घालू नका.

02
- वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नये, त्याची पाने किंवा फांदी तोडू नये. जर तुम्ही घरी वडाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी फांदी तोडून घरी आणावी.

03
- वट सावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळतात. चुकून उलटी परिक्रमा होणार नाही, हे लक्षात ठेवा.

04
- वट सावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील.

05
- जर गर्भवती स्त्रीने वट सावित्री व्रत पाळले असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये. फक्त वडाची पूजा करावी.

06
- वट सावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते, म्हणून वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐका. कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये पूर्ण करावी. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :
  • वट सावित्री व्रताच्या दिवशी हे काम करू नये - - वट सावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका, यामुळे अशुभ परिणाम मिळतात. महिलांनी काळे-निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही. या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करा. काळ्या बांगड्या चुकूनही घालू नका.

    MORE
    GALLERIES