दिवसासाठीचा सारांश : ओरॅकल रीडिंगदरम्यान ही कार्ड्स एक गूढ ऊर्जा प्रकट करतात. नकारात्मक प्रभावपासून स्वतःचं रक्षण करण्याचं महत्त्व आणि रचनात्मक कृतीचं महत्त्व हे मार्गदर्शन अधोरेखित करतं. संयम आणि चिकाटीमुळे यश मिळवता येऊ शकतं असं हे भविष्य सांगतं. दीर्घ काळ प्रार्थना केलेल्या गोष्टीवर उत्तर मिळू शकतं आणि सकारात्मक बदल घडू शकतात. आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार राहा आणि विश्वाच्या दैवी काळाबाबत विश्वास ठेवा.या मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे प्रगती होईल आणि परिपूर्णता मिळेल. मेष (Aries) आजच्या दिवसातली एखादी बैठक तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकते. ती रहित करू नका. स्वतःच्या मनाचा कौल घ्या. गुरूंकडून मार्गदर्शन मिळवणं याला तुमचं प्राधान्य असलं पाहिजे. नव्या संधींचा फायदा करून घ्या. अर्थकारणाविषयीच्या सुरुवातीच्या धड्यांमुळे तुमची पैशांबाबतची मानसिकता बदलली असेल. मिळालेल्या माहितीचा उपयोग करून मिळणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग करा. खर्चाच्या सवयींबाबत सजग राहा. स्वतःची काळजी घेण्यावर भर द्या आणि तुम्हाला साजेसं दैनंदिन वेळापत्रक तयार करा. LUCKY Sign - A Lifeboat LUCKY Color - A Magenta LUCKY Number - 65 वृषभ (Taurus) प्रेमाबाबतची तुमची प्रार्थना लवकरच फळाला येऊ शकते. एका सुंदर आणि परिपूर्ण नात्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल. या प्रवासावर विश्वास ठेवा. लेखनामध्ये यश मिळेल. इच्छुक असाल, तर नाट्य प्रशिक्षणासाठी तयारी करा. तुमच्या करिअरला आधीपेक्षा चांगला अर्थ प्राप्त होईल. नव्या संधींवर लक्ष ठेवा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. प्रकृतीबाबत डॉक्टरांची नेहमीची भेट घ्या व तपासणी करून घ्या. आरोग्याला प्राधान्य द्या. प्रकृतीची काळजी घेतल्यानं मानसिक शांतता लाभेल. LUCKY Sign – A Carnation LUCKY Color – Purple LUCKY Number - 5
मिथुन (Gemini) तुम्हाला हवं असलेलं प्रेम मिळवून देण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करील. नव्या शक्यता आजमावून पाहण्याची तयारी ठेवा. परिपूर्ण नातं तयार करण्यासाठी तुमचं मन तुम्हाला मार्गदर्शन करील, यावर विश्वास ठेवा. करिअरमध्ये भरारी घ्या. यश दृष्टिक्षेपात असेल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धडाडी ठेवा. जोखीम पत्करण्यासाठी घाबरू नका. तुमची मेहनत आणि निष्ठेचं फळ आता मिळणार आहे. खर्चाबाबत सजग राहा. आर्थिक बाबींवर लक्ष ठेवा. नव्या संधींचा लाभ घ्या. नियोजन आणि खर्चाचा ताळमेळ बसवून तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता. तब्येतीबाबत सक्रियतेनं पावलं उचलून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घेण्याची सवय लावा. LUCKY Sign – A Brown Bag LUCKY Color – Neon Pink LUCKY Number - 6 कर्क (Cancer) प्रेमाच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. एखादं नवं नातं सुरू करण्याचा किंवा नात्यातली बांधिलकी जपण्याचा निर्णय घ्याल. अंतर्मनाचा कौल घ्या. काही बदल होऊ शकतात. यश आणि नव्या संधी मिळण्याची ही चिन्हं आहेत; पण तुम्ही लवचिक आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं धोरण ठेवा. नव्या आर्थिक संधी मिळतील. नवी नोकरी किंवा उत्पन्नाचं नवं साधन मिळेल. खर्चाबाबत सजग राहा. विश्रांती घ्या. निसर्गाशी संवाद साधा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. LUCKY Sign – A Ceramic Vase LUCKY Color – Powder Blue LUCKY Number - 16 Rashichakra: केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं सिंह (Leo) रोमँटिक नात्याची सुरुवात होऊ शकते. एखाद्या नवीन नात्याची सुरुवात किंवा असलेल्या नात्यामध्ये बांधिलकी जपली जाऊ शकते. या नव्या ऊर्जेसाठी तुम्ही तयार राहा. करिअरमध्ये ही बदलाची वेळ असेल. काही तरी नवीन साध्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. मनाचा कौल घ्या व स्वतःवर विश्वास ठेवा. आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी संधी मिळेल; पण स्वतःच्या खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक उद्दिष्टांमध्ये स्थिरता ठेवा आणि घाईघाईने काही खरेदी करताना सजगता ठेवा. आरोग्याबाबत नेहमीच्या तपासण्या करा व स्वतःची काळजी घ्या. भावनिक, शारीरिक आणि मानसिक गरजांकडे लक्ष द्या. LUCKY Sign – An Engine LUCKY Color – Charcoal Grey LUCKY Number - 12 कन्या (Virgo) तुमच्या आयुष्यात आनंदाची पखरण करू शकेल, अशा एखाद्या नव्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. सध्याच्या नात्यामध्ये असलेली संवाद आणि प्रामाणिकपणाची गरज तुम्ही मोकळेपणानं सांगाल. कामाच्या ठिकाणी सावध आणि तपशिलांबाबत काटेकोर राहण्याची दक्षता घ्याल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. सर्व पर्यायांचा सखोलपणे विचार करा. उत्पन्नात वाढ होईल किंवा नव्या वित्तीय संधी मिळतील. खर्चाच्या नियोजनाबाबत काळजी घ्या. नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी तुम्ही उत्सुक व प्रोत्साहित असाल. नियमित तपासण्या करून आरोग्याची काळजी घ्या. LUCKY Sign – A White Rose LUCKY Color - Yellow LUCKY Number - 11 तूळ (Libra) प्रेमाच्या नात्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतील. नवं प्रेम मिळण्याची शक्यता आहे; मात्र निर्माण होणाऱ्या वादांबाबत सावध राहा. संवादावर भर द्या आणि स्वतःशी व जोडीदाराशी प्रामाणिक राहा. करिअरच्या बाबतीत संयमी राहा. मार्गात अडचणी येऊ शकतात; मात्र ध्येयावर लक्ष केंद्रित करा व क्षमतांवर विश्वास ठेवा. शेवटी तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. खर्चाबाबत सजग राहा. अनावश्यक खर्च टाळा. खर्चाचं नियोजन करून भविष्याची तरतूद करा. व्यायाम आणि विश्रांतासाठी वेळ काढा. ताण आणि चिंतेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर वेळीच उपाय करा. एखादी ट्रिप किंवा नवीन प्रवासाला सुरुवात करा. LUCKY Sign – A Milestone LUCKY Color – Beige LUCKY Number - 10 तुमची आहे का ही रास, होऊ शकतो धनवर्षा; सगळीकडून आनंदवार्ता कानी पडतील वृश्चिक (Scorpio) प्रेमाच्या नातेसंबंधामध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो; मात्र अखेरीस सकारात्मकता आणि आशावाद दिसून येईल. कामाच्या ठिकाणीही काही अडचणी येऊ शकतात. उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा व निष्ठेनं प्रयत्न करा. खर्चाच्या सवयींबाबत सजग राहा. अतिउत्साहाने खरेदी करू नका. पैशांबाबत शिस्तीचं धोरण पाळा. प्रवासातून नवे साहसी अनुभव मिळतील. ते स्वीकारून प्रवास करा. प्रवासामध्ये स्थिरतेचं धोरण ठेवा. LUCKY Sign – A Sparrow LUCKY Color - Saffron LUCKY Number - 25 धनू (Sagittarius) सध्याचा काळ रोमँटिक आणि उत्कटतापूर्ण आहे. तुमच्या लव्ह लाइफमध्ये सकारात्मक ऊर्जा असेल. यामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेलं नातं घट्ट होईल किंवा एखादं नवं नातं जोडलं जाईल; मात्र काही वाद किंवा गैरसमज होऊ शकतात, त्याबाबत सावध राहा. कामाच्या ठिकाणी विकास व प्रगतीची संधी दृष्टिक्षेपात आहे; मात्र स्पर्धकांबाबत सावध राहा. आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मकता दिसून येईल. अति खर्च टाळण्याबाबत सजग राहा. आर्थिक उद्दिष्टांबाबत वास्तववादी राहा. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल. कोणतंही आव्हान स्वीकारून ते पार करण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. स्वतःची काळजी घेण्यावर भर द्या. शारीरिक व भावनिक गरजांमध्ये समतोल साधा. प्रवासामध्ये सकारात्मक ऊर्जेमुळे नवे अनुभव मिळतील. LUCKY Sign – An Aquarium LUCKY Color - Pink LUCKY Number - 16 या राशींच्या मुलांवर मुली लगेच इम्प्रेस होतात; त्यांचे हे गुण आकर्षक ठरतात मकर (Capricorn) तुमच्या लव्ह लाइफमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. कदाचित एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते; मात्र गैरसमज होऊ शकतात. त्याबाबत सजग राहा. करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळण्याचे दिवस आहेत. एखादी अनपेक्षित संधी मिळेल किंवा ओळख प्रस्थापित होईल. दीर्घ काळात नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आत्मसंतुष्ट किंवा गर्व होऊ न देण्याकडे लक्ष द्या. एखादा आर्थिक लाभ होऊ शकतो. अतिउत्साहाने खर्च करू नका, तसंच निर्णयही घेऊ नका. त्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सुधारेल. नव्या ठिकाणांना भेटी द्याल. नवे अनुभव मिळवाल. सुरक्षिततेबाबत आवश्यक ती काळजी घ्या. LUCKY Sign – A Copper Vessel LUCKY Color - Blue LUCKY Number – 8 कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? तुमच्या राशीला काय असेल सर्वात बेस्ट ऑप्शन कुंभ (Aquarius) नातेसंबंध दृढ होतील. तसंच नात्यातली बांधिलकी गहिरी होईल. सुंदर आणि एकोप्याचं नातं तयार होईल; मात्र नात्यामधल्या आव्हानांना पार करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी अवघड परिस्थिती असेल. करिअरमध्ये बदल संभवतो. या बदलामुळे विकासाच्या नव्या संधी मिळतील. स्वास्थ्याविषयी तुम्ही योग्य मार्गावर आहात; मात्र आरोग्य सांभाळण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबाबत समतोल राखण्यासाठी तुम्हाला नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. नियोजन न करता केलेल्या एखादी ट्रिपमुळे तुमची वैयक्तिक प्रगती होईल. मार्गात अनपेक्षित विलंब होऊ शकतो. LUCKY Sign – A Lamp Shade LUCKY Color – Silver LUCKY Number - 4 या जन्मतारखा असलेल्या जोडप्यांचं चांगलं जमतं; एकमेकांसाठी लकी ठरतात मीन (Pisces) प्रेम आणि नातेसंबंधांबाबत सकारात्मक ऊर्जेचं वातावरण राहील. भावनिकदृष्ट्या परिपूर्णता मिळेल. काही गैरसमज होऊ शकतात. तिथे प्रामाणिकपणे संवाद साधण्याची गरज आहे. करिअरमध्ये काही संधी मिळू शकतील; पण तुम्हाला संभाव्य अडथळे किंवा संघर्षांबद्दल लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यातून मार्ग काढण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरी गरजेची आहे. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार व स्वतःच्या काळजी घेण्याच्या सवयींमुळे आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडू शकतात. सकारात्मक आणि नव्या साहसी अनुभवांसह एखादा प्रवास घडू शकतो. लवचिकता ठेवा. एखाद्या सरप्राइजसाठी तयार राहा. वर्तमानामध्ये जगा व प्रवासाचा आनंद घ्या. LUCKY Sign – A Jewellery Box LUCKY Color – Gold LUCKY Number - 50