क्रमांक 9: क्रमांक एक आणि क्रमांक नऊमधील संबंध फारच उत्कृष्ट असतात. सूर्याचा प्रभाव असलेला एक आणि मंगळाचा प्रभाव असलेला नऊ यांच्यातील सुसंवादी नातं हे काळाबरोबर वाढतच जाते.
या अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती सर्वोत्तम परस्पर संवाद, निष्ठा, आर्थिक लाभ आणि सामाजिक सन्मानाचा आनंद घेतात. ते एकमेकांना फार चांगल्या प्रकारे समजून घेतात.
दोन्ही संख्यांचा प्रभाव असलेल्या व्यक्ती सर्जनशील, हुशार, मानसिकदृष्ट्या सतर्क, सुसंवादी, व्यक्त होणाऱ्या आणि प्रतिभावान असतात.
या व्यक्ती इतरांच्या कामाचा आणि कौशल्यांचा आदर करतात. लाईफ पार्टनर म्हणून ते त्यांच्या जोडीदाराच्या यशात योगदान देतात. त्यामुळे त्यांची जोडी आदर्श ठरते.
व्यावसायिक भागीदार असलेल्या, विशेषत: सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती एकत्र प्रभावी कामगिरी करू शकतात. एक आणि नऊचा प्रभाव असलेल्या व्यक्तींनी समृद्धी आणि ऐश्वय मिळवण्यासाठी उजव्या हाताच्या मनगटाभोवती लाल दोरा बांधला पाहिजे.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)