जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Horoscope: या राशींसाठी आज शुभ दिवस; महत्त्वाची कामं संध्याकाळपर्यंत लागतील मार्गी

Horoscope: या राशींसाठी आज शुभ दिवस; महत्त्वाची कामं संध्याकाळपर्यंत लागतील मार्गी

कसा असेल 11 जुलैचा दिवस?

कसा असेल 11 जुलैचा दिवस?

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिवसासाठीचा सारांश: आजच्या ओरॅकल रिडिंगनुसार असं दिसतं की, तुमच्या सध्याच्या परिस्थितीत मेहनतीचं फळ मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी खूप समर्पित प्रयत्न केलेले आहेत आणि आता त्याचं फळ मिळवण्याची वेळ आली आहे. नवीन नातेसंबंध तयार होण्याची शक्यता आहे. हे रोमँटिक किंवा प्लॅटोनिक कनेक्शन असू शकतं जे तुमच्या जीवनात आनंद आणि सकारात्मकता आणेल. या नवीन नातेसंबंधांचा विचार करताना मन आणि हृदय मोकळं ठेवणं गरजेचं आहे. भूतकाळातील गोष्टी विसरून नकारात्मक भावना किंवा अनुभवांना सोडून देण्याची गरज आहे. असं केल्यास तुम्ही निर्मळ मनानं आणि चांगल्या उद्देशाच्या प्रगती करू शकाल. एकूणच आजचा दिवस नातेसंबंधांना महत्त्व देणारा आहे. मेष (Aries)  आज तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये आनंद आणि सुसंवाद दिसेल. तुमचं नातं सकारात्मक दिशेनं वाटचाल करत असल्याचं हे लक्षण आहे. तुम्‍ही आणि तुमच्या जोडीदारानं आनंद देणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कारकीर्दीच्या चांगल्या टप्प्यात किंवा आर्थिक विकासाच्या टप्प्यात प्रवेश करत आहात. तुमच्याकडे यश मिळवण्याची क्षमता आहे, त्यासाठी योग्य आधार मिळवून कामाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुमच्याकडे लवचिकता आणि सामर्थ्य असणं आवश्यक आहे. तुम्हाला आव्हानं किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागेल. या सर्व परिस्थितीवर मात करताना तुम्ही खंबीर राहून तुम्ही मार्गाक्रमण केलं पाहिजे. LUCKY Sign - A Peacock Feather LUCKY Color - Indigo LUCKY Number - 2

News18लोकमत
News18लोकमत

वृषभ (Taurus)  तुम्ही नवीन नातेसंबंध जोपासण्याचा किंवा सध्याचं नातं मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. यातून वाढ, प्रजनन आणि पोषण ऊर्जा दिसते. यातून असं सूचित होतं की, प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय, संपत्ती आणि सुबत्तादेखील यातून सूचित होते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आर्थिक यश अनुभवत आहात. ही उर्जा तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यास आणि योग्य गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. तुम्हाला तुमच्या जीवनात संतुलन शोधण्याची गरज भासू शकते. म्हणजेच तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पूरक अशी दिनचर्या स्वीकारावी लागेल. ओरॅकल असं सूचित करतं की, आज केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. LUCKY Sign - A Rudraksha LUCKY Color - Pink LUCKY Number - 66 स्वप्नात या 5 गोष्टी दिसणं शुभ संकेत मानतात; अचानक चमकू शकतं नशीब मिथुन (Gemini)  ओरॅकल सूचित करतं की, आज तुमच्या नातेसंबंधांत संवाद महत्त्वाचा आहे. तुम्ही खरं बोलण्याची आणि स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे. आपल्या जोडीदारासह अर्थपूर्ण कनेक्शन तयार होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी आणि आयडियांचा अनुभव येईल. ही उर्जा तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यास आणि योग्य गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. एखाद्या नवीन ठिकाणी भेट देणं किंवा फक्त आपल्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणं, ही चांगली कल्पना ठरू शकते. तुम्ही खाण्याच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. जेणेकरून तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला आधार मिळेल. आज जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी प्रवास टाळा. LUCKY Sign - A Solo Performance LUCKY Color - Brown LUCKY Number - 26 कर्क (Cancer)  ओरॅकल सूचित करतं की, तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधांशी संबंधित प्रवास सुरू करत आहात. याचा अर्थ नवीन नातेसंबंध किंवा सध्याच्या नातेसंबंधांना वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. यातून घडामोडी आणि प्रगती दिसते. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. ओरॅकल तुम्हाला धीर धरण्यास, वाढ आणि बदलाच्या नैसर्गिक चक्रांवर विश्वास ठेवण्यासदेखील प्रोत्साहित करत आहे. हे भागीदारी आणि भेटवस्तू देण्यास सूचित करतं. तुमच्या सभोवतालचे मदतपूर्ण संबंध तुमच्या कल्याणासाठी फायदेशीर असू शकतात. योग्य दृष्टिकोन मिळवण्यासाठी नवीन लोकांना भेटण्याची आणि नवीन अनुभवांशी कनेक्ट होण्याची संधी मिळेल. LUCKY Sign - A New Acquaintance LUCKY Color - Silver LUCKY Number - 17 प्रेमविवाहासाठी प्रपोज करण्यास वेळ अनुकूल! शुक्राची ग्रहस्थिती या राशींना लाभणार सिंह (Leo)  ओरॅकलनुसार, तुमच्या राशीत यश आणि कर्तृत्व निदर्शनास येत आहे. यातून असं लक्षात येतं की, तुमच्या नातेसंबंधांची भरभराट होत आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे संवाद साधू शकाल. वाढ आणि भरभराट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळतील. प्रयत्नांसोबत तुम्हाला धीर आणि चिकाटी या दोन गुणांची गरज आहे. ओरॅकल सूचित करतं की, आज केलेला प्रवास तुमच्यासाठी कामाशी संबंधित लीड्स आणू शकतो आणि त्यातून फायदा मिळवण्याची संधी देऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी योग्य माध्यम किंवा ठिकाणाचा शोध घेतला पाहिजे. आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या किरकोळ चोऱ्यांपासून तुम्ही सतर्क राहणं गरेजचं आहे. असं न केल्यास तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. LUCKY Sign - A Table Calendar LUCKY Color - Blue LUCKY Number - 25 कन्या (Virgo) तुमच्या राशीसाठीचं आजचं ओरॅकल भागीदारी आणि समतोलाबद्दल माहिती देत आहे. यातून सूचित होतं की, तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि कनेक्शन दिसेल. वादात मध्यस्थीला बोलवलं जाईल. आज प्रवास आणि घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. तुम्हाला प्रवास करून किंवा नवीन संधी शोधून फायदा मिळवता येऊ शकतो. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आध्यात्मिक साधना करून किंवा आध्यात्मिक साधक व गुरूंशी संपर्क केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. LUCKY Sign - A Fancy Lampshade LUCKY Color - Peach LUCKY Number - 4 Manjari: दारात तुळस आहे, तर हे काम लक्षात ठेवा; कुंटुबावर राहील लक्ष्मीची कृपा तूळ (Libra) ओरॅकल सूचित करते की, तुमच्या मनात प्रेम आणि कनेक्शनसाठी जागा निर्माण होईल. तुम्ही आज क्षमा, करुणा आणि आत्मप्रेमावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्ही अशा आध्यात्मिक अभ्यासाकडे आकर्षित होऊ शकता जे तुम्हाला हे गुण विकसित करण्यास मदत करतात. तुम्ही कृतज्ञता आणि विश्वास यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपचार व मार्गदर्शनाच्या शोधात असाल. याबाबत तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून पाठिंबा आणि मदत मिळेल. त्यातून तुम्हाला अधिक सशक्त वाटेल आणि सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवून जोखीम स्वीकारली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. LUCKY Sign - Abstract Art LUCKY Color - Lilac LUCKY Number - 18 वृश्चिक (Scorpio)  ओरॅकल सूचित करतं की, तुम्ही घनिष्ठ आणि आश्वासक मैत्री निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. निष्ठा आणि विश्वासाच्या मदतीनं तुम्ही इतरांशी घनिष्ठ आणि अर्थपूर्ण संबंध तयार करू शकाल. तुम्हाला नवीन मार्गदर्शकाची आणि तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. यश मिळविण्यासाठी तुम्ही इतरांकडून नवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक असलं पाहिजे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमचे विचार आणि भावनांकडे लक्ष द्या. आज तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवास करण्याची किंवा नवीन अनुभव मिळवण्याची संधी शोधावी लागेल. या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या ठरू शकतात. LUCKY Sign - A Floral Design LUCKY Color - Cyan LUCKY Number - 8 Rashi effect: श्रावण सुरू होण्याच्या आधी या 3 राशींना आर्थिक लाभाचे योग धनू (Sagittarius)  प्रियजनांसोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्हाला मन मोकळं ठेवावं लागेल. त्यासाठी मनामध्ये असुरक्षिततेची भावना येऊ देऊ नका. तुम्ही नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील कामाकडे आकर्षित होऊ शकता. ओरॅकल सूचित करतं की, यशासाठी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवला पाहिजे. यातून तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि आत्मजागृतीची सखोल भावना विकसित करण्यास प्रोत्साहन मिळेल. नवीन अनुभवांद्वारे प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या संधीसाठी तुम्हाला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. LUCKY Sign - A Teakwood Table LUCKY Color - Saffron Orange LUCKY Number - 77 मकर (Capricorn) ओरॅकल सूचित करते की, तुम्ही नवीन रोमँटिक पार्टनरशीपसाठी तयार असाल किंवा तुमच्या सध्याच्या नात्यात अधिक कमिटमेंट मिळेल. प्रेम मिळवण्यासाठी मोकळ्या मनानं जगलं पाहिजे. युनिव्हर्स तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती आणेल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शक किंवा जाणकारांकडून मार्गदर्शन घेतल्यास फायदा होऊ शकतो. तुम्हाला कदाचित आत्म शंका किंवा असुरक्षिततेचा सामना करावा लागेल. यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:वर प्रेम करायला शिका आणि स्वत:तील अद्वितीय गुणांचा स्वीकार करा. प्रिय व्यक्ती किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून पाठिंबा मिळाल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. विश्रांती आणि रिफ्रेश होण्यासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. LUCKY Sign - A Large Coffee Mug LUCKY Color - Cream LUCKY Number - 22 पितृ-कालसर्पदोष मुक्तीसाठी सोमवती अमावस्या आहे खास; या उपायांनी दिसेल परिणाम कुंभ (Aquarius)  तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेच्या भावनेचा अनुभव येईल. रिलेशनशीप आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. असं केल्यास तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे, हे निदर्शनास येईल. ओरॅकल असे सूचित करते की, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. पण, काहीवेळा तुम्हाला स्वत: ची शंका वाटेल किंवा स्वत:वरील विश्वास डळमळीत होईल. तुमच्या स्वतःच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला नवचैतन्य मिळू शकतं. हे ओरॅकल तुम्हाला तुमच्या नित्यक्रमातून विश्रांती घेण्यास आणि स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते. LUCKY Sign - Money Plant LUCKY Color - Brown LUCKY Number - 45 मीन (Pisces) तुमच्या आयुष्यात प्रेम आणि रोमान्स येण्याची शक्यता आहे. ओरॅकल सूचित करते की, तुम्ही नवीन रिलेशनशीपकडे आकर्षित होत आहात किंवा सध्याचं रिलेशनशीप मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहात. या बाबत युनिव्हर्स तुम्हाला मार्गदर्शन आणि समर्थन करत आहे. करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यावर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सामर्थाच्या वापर केला पाहिजे. तुम्हाला कदाचित एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि लवचिकता तुमच्याकडे आहे. तुम्हाला काही धाडसी गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्यासाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन दृष्टिकोन मिळवण्याची संधी मिळेल. LUCKY Sign - A Creeper LUCKY Color - Dark Grey LUCKY Number - 3

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात