जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Reincarnation: तुम्हाला आपला पुनर्जन्म झाल्याचं कधी जाणवलंय का? असे असतात त्याचे संकेत

Reincarnation: तुम्हाला आपला पुनर्जन्म झाल्याचं कधी जाणवलंय का? असे असतात त्याचे संकेत

पुनर्जन्म होण्याचे संकेत?

पुनर्जन्म होण्याचे संकेत?

Reincarnation: तुमचा पुनर्जन्म झाला आहे की नाही, याचे संकेत देणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात घडत असतात. या जन्मातल्या तुमच्याशी संबंधित नसलेल्या आठवणीसुद्धा वारंवार आठवत असतील, स्वप्नात अशा गोष्टी दिसत असतील तर…

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जुलै : पुनर्जन्माबद्दल अनेकांना आकर्षण असतं. आत्मा, पुनर्जन्म यांवर अनेकांचा विश्वास असतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, की ज्या तुमच्याबाबतीत घडत असल्या, तर कदाचित तुमचा आत्ता पुनर्जन्म झालेला असू शकतो. ‘स्टार्स इन्सायडर’ने याबाबतचं वृत्त दिलंय. तुमचा पुनर्जन्म झाला आहे की नाही, याचे संकेत देणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात घडत असतात. या जन्मातल्या तुमच्याशी संबंधित नसलेल्या आठवणीसुद्धा वारंवार आठवत असतील, स्वप्नात अशा गोष्टी दिसत असतील, विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल अकल्पनीय आत्मीयता वाटत असेल, तर अशा गोष्टी तुमच्या आत्म्याने अनेक वेळा पुनर्जन्म घेतला आहे, याकडे संकेत करीत असतात. तुमचा पुनर्जन्म झाला आहे, असं वाटत असेल, तर कोणकोणते संकेत मिळू शकतात, याविषयी ‘ स्टार्स इन्सायडर ’ने जाणून घेऊ. अचानक दुसरी भाषा बोलणं एखाद्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात कधीही न वाचलेली, त्याला माहिती नसलेली, कधीही न ऐकलेली भाषा अचानक बोलण्यास सुरुवात केली, किंवा त्याला ती भाषा अगदी सहज समजू लागली, तर हा त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाल्याचा संकेत आहे. एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागल्याचे प्रकार घडल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलंही असेल. संमोहित झाल्यावर किंवा कोमातून बाहेर पडल्यावर एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागते. जन्मखूण असणं एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारी जन्मखूणसुद्धा पुनर्जन्माचा संकेत देत असते. ही जन्मखूण कधी कधी पूर्वजन्मातल्या आघाताची शारीरिक खूण मानली जाते. उदाहरणार्थ, कपाळावर मोठी जन्मखूण असेल, तर अशा व्यक्तीला मागच्या जन्मात तेथे मोठी दुखापत झाली होती, असं मानतात.

News18लोकमत
News18लोकमत

अनोळखी व्यक्तीबाबत खूप आत्मीयता वाटणं कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीबाबत अचानक आत्मीयता वाटू लागते. संबंधित व्यक्तीसोबत स्वतःचे खूपच दृढ संबंध आहेत, असं वाटू लागतं. हादेखील पुनर्जन्माचा संकेत आहे. कारण पूर्वीच्या जन्मातल्या एखाद्या व्यक्तीशी आत्म्याचं कनेक्शन असतं, असं मानलं जातं. तसंच कोणताही आजार नसताना अचानक सुरू झालेल्या वेदनाही पुनर्जन्माचे संकेत देतात. भीती वाटणं एखाद्या गोष्टीबाबत खूप भीती वाटणं, त्याबाबत फोबिया असणं, हेदेखील पुनर्जन्माचा संकेत देत असतं. कारण भूतकाळातल्या अनुभवांमधून अकल्पनीय आणि तीव्र भीती किंवा फोबिया होऊ शकतो. काहींचा असा विश्वास आहे की, भूतकाळातल्या आघातांचे प्रतिध्वनी भीतीच्या रूपात अनुभवता येतात. पृथ्वीबाबत आपलेपणा न वाटणं जर तुम्हाला वाटत असेल, की पृथ्वी तुमचं घर नाही आणि तुम्ही पृथ्वीवरचे नाहीत, तर हादेखील पुनर्जन्माचा संकेत मानला जातो. कारण अनेक वेळा पुनर्जन्म घेतलेले आत्मे पृथ्वीवरच्या जीवनाला कंटाळलेले/थकलेले असतात. त्यांना आता जन्माचं चक्र पूर्ण करून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते. भारतातील या प्रसिद्ध मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ‘ड्रेस कोड’; ही माहिती वाचूनच जा स्वप्न स्वप्न ही अचेतन मनाचं प्रतिबिंब असतात आणि काहींचा असा विश्वास आहे, की वारंवार पडणारी स्वप्नं पुनर्जन्मातले अनुभव प्रतिबिंबित करू शकतात. काहींना अशा ठिकाणांची, व्यक्तींची स्वप्नं पडत असतात, ज्यांना ती या जन्मात कधीच भेटलेली नसतात; पण त्यांना स्वप्नात येणारं ते ठिकाण, व्यक्ती खूप परिचित वाटत असतात. विविध आठवणी लहान मुलांच्या बाबतीत सहसा असे प्रकार घडतात. अशी अनेक प्रकरणं घडली आहेत, ज्यामध्ये लहान मुलं अशा काही आठवणींचं तपशीलवार वर्णन करू शकतात, ज्या त्यांनी कधीही अनुभवलेल्या नसतात. या आठवणी केवळ काल्पनिक वाटू शकतात; मात्र ही गोष्टदेखील पुनर्जन्माचे संकेत देणारी असते. स्वतःचं वय जास्त वाटणं बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं वय जास्त वाटू लागतं किंवा एखादी व्यक्ती लहान असतानाही मोठ्या व्यक्तीसारखे वागत असल्याचं जाणवतं, तर हेसुद्धा पुनर्जन्माचे संकेत देते. तुम्ही किती वेळा पुनर्जन्म घेतला हे तुमच्या उर्जेमध्ये परावर्तित होत असते. Shukra gochar: या 4 राशींना विशेष दक्ष राहावं लागणार, काय आहे कारण? आकर्षण, आत्मीयता वाटणं एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे यापूर्वीही आलेलो असल्यासारखं वाटणं, एखादं ठिकाण, संस्कृती किंवा वातावरणाबाबत एक अवर्णनीय आकर्षण, आत्मीयता वाटणं, हे सूचित करू शकतं, की तुम्ही ते आधीच अनुभवलं आहे. प्राचीन ग्रीक संस्कृती, पहिलं महायुद्ध किंवा प्राचीन इजिप्शियन याच्याशी संबंधित अनेक उदाहरणं समोर येतात. अंतर्ज्ञान अंतर्ज्ञानदेखील पुनर्जन्माकडे संकेत करते. एखाद्या न घडलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला समजणं किंवा अशी गोष्ट समजण्यास तुम्ही सक्षम असल्यास, तुमच्याकडे तीव्र अंतर्ज्ञान असू शकतं. तुम्ही मागच्या जीवनातल्या विविध घटनांमधून खूप अनुभव घेतला असून त्याचा तुम्हाला वर्तमान जीवनात फायदा होतोय, असं त्यातून निर्देशित होतं. सहानुभूती सहानुभूतीमुळे आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावना, ऊर्जा आणि वेदना आत्मसात करू शकते. तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत किती सहानुभूती वाटते, यावरूनदेखील सूचित होऊ शकतं, की तुमच्या आत्म्याने पुनर्जन्म घेतला आहे आणि तुमच्याकडे वैयक्तिक स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करून इतरांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. पूर्वज्ञान ‘भविष्याविषयीची दृष्टी’ हेदेखील पुनर्जन्म झाल्याचं एक लक्षण मानलं जातं. कारण यामध्ये दृष्टान्त, शारीरिक संवेदना किंवा अगदी स्वप्नांद्वारे भविष्याबद्दल गोष्टी जाणून घेण्याची क्षमता समाविष्ट असते. काहींचा असा विश्वास आहे, की यावरून तुमचा आत्मा परिपक्व झाला आहे आणि अनेक आयुष्यं जगला आहे, असा संकेत मिळतो. चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा रेट्रोकॉग्निशन भूतकाळाबद्दल सहज उपलब्ध नसलेली माहिती मिळवण्याच्या क्षमतेला रेट्रोकॉग्निशन असं म्हणतात. हा पुनर्जन्माचा महत्त्वाचा असा संकेत समजला जातो. डेजा वू (déjà vu) डेजा वू ही संवेदना जवळपास प्रत्येकजण अनुभवत असतो. या संवेदनेस वास, आवाज, दृष्टी, अभिरुची आणि इतर अनेक घटकांमुळे चालना मिळत असते. न्यूरोलॉजिकल विसंगतीमुळे असं मानलं जातं, की यामध्ये भूतकाळातले अनुभव प्रकट होतात. हा पुनर्जन्माचा एक संकेत मानला जातो. व्यक्तीचा पुनर्जन्म होतो किंवा नाही, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. अशा वेळी पुनर्जन्माचा फार विचार न करता सध्याचा जन्म अधिक चांगल्या प्रकारे कसा निभावता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवं. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात