मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला चंद्र का पाहायचा नसतो? त्यापाठीमागे अशी आहे कथा

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला चंद्र का पाहायचा नसतो? त्यापाठीमागे अशी आहे कथा

आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नसतो, त्यामागे अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत, त्याविषयी जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 ऑगस्ट : गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. महाराष्ट्रसह देशात घरोघरी मोठ्या भक्तीभावाने, उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेश हे ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक घरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि गणेशाची विधीवत पूजा करतात. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की, गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे अशुभ मानले जाते. गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नसतो त्यामागे अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत, त्याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी (Ganesh Chaturthi 2022) दिलेली माहिती जाणून घेऊया.

चंद्राला दिला शाप -

एका आख्यायिकेनुसार, भगवान गणेश एकदा चंद्रलोकातून लाडू घेऊन येत होते. तेव्हा गणेशजींना पाहून चंद्रदेव जोरजोरात हसू लागले. यामुळे गणेशाला राग आला आणि त्याने चंद्रदेवांना शाप दिला की तुला तुझ्या रूपाचा खूप अभिमान आहे, तुझा नाश होईल.

तर दुसर्‍या कथेनुसार, एकदा गणेशजी उंदराच्या स्वारीवरून जात होते. त्यावेळी उंदराने अचानक सापाला पाहून उडी मारली. त्यामुळे गणेशजीही जमिनीवर कोसळले. चंद्रदेवांनी हा प्रसंग पाहिला आणि ते हसू लागले. तेव्हा गणेशजी क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला क्षय होण्याचा शाप दिला.

गणेश चतुर्थीला चंद्र का नाही पाहायचा?

असे मानले जाते की, गणेश चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो, म्हणून गणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी चंद्राचा आकार कमी होतो किंवा वाढतो, म्हणून गणेश चतुर्थीला चंद्र दिसणे अशुभ मानले जाते.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

चंद्र दिसला तर काय कराल?

गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नसतो, मात्र चुकून दिसल्यास शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी खालील मंत्राचा जप करावा.

सिंहः प्रसेनमवधित्सिम्हो जाम्बवत हठ |

सुकुमारका मरोदिस्तव ह्यशा स्यामंतकाह ||

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion