जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Positive Thought : चिंता, द्वेष, मत्सर होतील दूर; मनशांतीसाठी भगवान गौतम बुद्धांचे अमूल्य विचार करा आत्मसात

Positive Thought : चिंता, द्वेष, मत्सर होतील दूर; मनशांतीसाठी भगवान गौतम बुद्धांचे अमूल्य विचार करा आत्मसात

Positive Thought : चिंता, द्वेष, मत्सर होतील दूर; मनशांतीसाठी भगवान गौतम बुद्धांचे अमूल्य विचार करा आत्मसात

बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्धांनी केली. त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. गौतम बुद्धांच्या संदेशाला जीवनात विशेष महत्त्व आहे. त्यांचे अनमोल विचार प्रत्येकाने जीवनात अंगीकारले पाहिजेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वात मोठा धर्म मानला जातो. गौतम बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ गौतम होते. महान गौतम बुद्धांनी आपले संपूर्ण जीवन समाज कल्याण आणि ध्यानासाठी समर्पित केले होते. त्यांची शिकवण माणसाला दु:ख आणि वेदनांपासून मुक्त करण्याचे साधन बनली. भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. गौतम बुद्धांच्या अमूल्य विचाराचा अभ्यास केल्यास मनाला शांती मिळते आणि चिंता, द्वेष, मत्सर यापासून मुक्ती मिळते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून गौतम बुद्धांच्या अशा मौल्यवान विचारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात केला पाहिजे.

Astro Tips : बिग बी ते किंग खान, सेलिब्रिटी घालतात ‘ही’ रत्नं; चमकलं त्यांचंही नशीब

गौतम बुद्धांचे अमूल्य विचार 1- द्वेष द्वेषाने नाहीसा करता येत नाही. तर तो प्रेमानेच नाहीसा करता येतो, हे नैसर्गिक सत्य आहे. 2- जे घडून गेले त्यात आपण अडकू नये, भविष्याची काळजी करू नये. आपण वर्तमानातच जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे. 3- जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावर प्रेम करत नाही, त्याला एकही त्रास होत नाही. 4- तुम्ही कितीही पुस्तके वाचा, कितीही चांगली प्रवचने ऐका. त्यांचा जीवनात अवलंब केल्याशिवाय काही उपयोग होणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

5- तुमच्याकडे जे आहे त्याची अतिशयोक्ती करू नका किंवा इतरांचा मत्सर करू नका. 6- कोणत्याही वादादरम्यान राग येताच, आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो. 7- जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाशिवाय माणूस जगू शकत नाही. Vastu Tips : घरात ठेवा हे फेंगशुई बेडूक, कधीच भासणार नाही पैशांची चणचण, वाचा इतर फायदे 8- आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. 9- आरोग्याशिवाय जीवन हे जीवन नाही, ते फक्त दुःखाची स्थिती - मृत्यूची प्रतिमा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात