मराठी बातम्या /बातम्या /religion /

Astro Tips : बिग बी ते किंग खान, सेलिब्रिटी घालतात 'ही' रत्नं; चमकलं त्यांचंही नशीब

Astro Tips : बिग बी ते किंग खान, सेलिब्रिटी घालतात 'ही' रत्नं; चमकलं त्यांचंही नशीब

सामान्य माणसांशिवाय बॉलिवूड स्टार्सचाही ज्योतिष आणि रत्नशास्त्रावर विश्वास आहे. याचे उदाहरण तुम्ही अमिताभ बच्चनयांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत घेऊ शकता. त्यांनी त्यांच्या कुंडलीनुसार रत्नेही धारण केली आहेत.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 17 सप्टेंबर : ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की रत्नांमध्ये आपले नशीब बदलण्याची शक्ती असते. मनुष्याच्या कुंडलीतील ग्रहांचे अशुभ प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी करून त्यांचे शुभ प्रभाव वाढवता येतात. असे अजिबात नाही की रत्नांचा प्रभाव फक्त सामान्य माणूसच मानतो. भारतात असे अनेक बॉलिवूड स्टार आहेत जे रत्नांच्या प्रभावावर विश्वास ठेवतात. यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीयही ज्योतिषावर विश्वास ठेवतात. अमिताभ बच्चन यांच्या हातात नीलमची अंगठी तुम्ही पहिलीच असेल. त्यांच्या आयुष्यात काही कठीण प्रसंगांना तोंड असताताना त्यांनी हे रत्न धारण केले. हे रत्न धारण केल्यानंतर त्याच्या प्रभावामुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे अभिनेते अमिताभ बच्चन एक महान नायक बनले.

Vastu Tips : घरात ठेवा हे फेंगशुई बेडूक, कधीच भासणार नाही पैशांची चणचण, वाचा इतर फायदे

शाहरुख खान शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून ओळखले जाते. तुम्ही शाहरुखला पन्नारत्न घातलेले पाहिले असेल. पन्ना हे बुधाचे रत्न मानले जाते. पन्ना रत्न परिधान केलेल्या व्यक्तीला संवाद कौशल्य, प्रसिद्धी, बुद्धिमत्ता, संपत्ती आणि व्यवसायात लाभ होतो. सलमान खान बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला तुम्ही ब्रेसलेट घातलेला पाहिला असेल. जो पिरोजा रत्नाशी संबंधित आहे. जेव्हा त्याचे अनेक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा सलमान खानने हे रत्न परिधान केले होते. अजय देवगण बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण पुष्कराज हे रत्न घालतो. पुष्कराज हे गुरू ग्रहाचे रत्न मानले जाते. असे मानले जाते की हे रत्न धारण केल्याने धन, सौभाग्य, समृद्धी आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळतो. याशिवाय अजय देवगणच्या एका बोटात मोती आहे. जे चंद्राचे रत्न आहे. हे रत्न मनाला शांती आणि स्थिर बुद्धी प्रदान करते. संजय दत्त संजू बाबा बॉलिवूडमध्ये त्याच्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखला जातो. संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या फिल्मी करिअरमध्येही अनेक चढ-उतार आले. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार संजय दत्तने हातात मोती आणि पिवळा पुष्कराज घातला आहे. Vastu Tips : ही मांजर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते, जाणून घ्या यासंबंधित फेंगशुई टिप्स ऐश्वर्या राय बच्चन ऐश्वर्या रायने हातात नीलम रत्न घातले आहे. याशिवाय तिने हिराही घातला आहे. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हिरा शुक्र ग्रहाचा प्रतिनिधी आहे आणि तो ग्लॅमरच्या जगात यश देतो.
First published:

Tags: Lifestyle, Religion, Star celebraties, Vastu

पुढील बातम्या