जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / बायको सारखी भांडते? प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

बायको सारखी भांडते? प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

बायको सारखी भांडते? प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांचे नीतिशास्त्र महत्त्वाचे आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै: आचार्य चाणक्य हे महान विद्वान मानले जातात. यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांचे नीतिशास्त्र महत्त्वाचे आहे. कारण चाणक्याने त्या विषयांचा अतिशय सखोल अभ्यास केला आहे, ज्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो.

News18लोकमत
News18लोकमत

चाणक्य नीतीचा अवलंब करून जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगातून सुटका मिळू शकते. म्हणूनच जो व्यक्ती चाणक्य नीतीचे पालन करतो तो आपल्या जीवनातील दु:ख आणि संकटांपासून मुक्त राहतो. पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्याने काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. पती-पत्नीलामध्ये हे नियम नसतील त्या घरांमध्ये दिवसेंदिवस कलह आणि भांडणाची परिस्थिती राहते. चाणक्य म्हणतात, की पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वात मजबूत बंधन आहे. पण हे नाते प्रेम आणि विश्वासावर अवलंबून आहे. वैवाहिक जीवनात प्रेम किंवा विश्वासाचा अभाव असेल तर हे नातेही कमकुवत होऊ लागते. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्याचे हे शब्द आजच आपल्या जीवनात अंमलात आणा. Chanakya Niti: लक्ष्मीप्राप्तीसाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती, का नष्ट होते मनुष्याची संपत्ती पती-पत्नीने केले पाहिजे हे काम चाणक्य नीती सांगते की, पती-पत्नीने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यास लाज वाटू नये. यामुळे नात्यात दुरावा आणि खट्टू होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये प्रेम, समर्पण आणि त्याग यात कधीही संकोच नसावा. त्यामुळे आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला आनंदी होण्याची संधी मिळेल तेव्हा त्याचा आनंद घ्या. वैवाहिक नात्यात प्रेमासोबतच आदरही महत्त्वाचा असतो. अहंकाराच्या भावनेने नाते पोकळ होऊ शकते. म्हणूनच ही गोष्ट कधीही विसरू नका. पतीने पत्नीचा आदर करून आणि पत्नीने पतीचा आदर करून जीवन जगावे. हा तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आधार आहे. नातेसंबंध बिघडण्याचे खरे कारण म्हणजे पती-पत्नीचा आदर वेगळा नाही हेच लोकांना समजत नाही. उलट पती-पत्नी ही जीवनाच्या रथाची दोन चाके आहेत. म्हणूनच पती-पत्नीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, एकमेकांच्या उणिवा किंवा चुका इतरांसमोर उघड होऊ नयेत. म्हणून श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही, हे कारण माहितीये तुम्हाला? चाणक्य नीती सांगते की गुप्त मार्गाने केलेले दान अनेक पटींनी फळ देते, चाणक्यानुसार एका हाताने दान करताना दुसरा हात गुप्त नसावा, तरच ते महत्त्वाचे आहे. हेच कारण आहे की तुम्ही धर्मादाय कार्यात खर्च करत असाल तर तुमच्या पत्नीलाही याचा उल्लेख करू नका. त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो. चाणक्याच्या मते, पत्नीला तुमची कमजोरी कळू देऊ नका. असे केल्यास नाराज होईल. चाणक्य म्हणतो की दुष्ट पत्नीदेखील तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकते. त्यामुळे तुमचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते. डोळ्यांची पापणी फडफडणेही असते शुभ, जाणून घ्या भविष्याची माहिती देणारे संकेत तुम्ही तुमच्या पत्नीच्या अपमानाची माहितीही देऊ नये. आचार्य चाणक्य म्हणतात की यामुळे माणूस प्रगती करू शकत नाही, त्याला आपला अपमान सतत आठवत राहतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात