मुंबई, 13 जुलै: हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आषाढीच्या देवशयीन एकादशीला सृष्टीचे संचालक भगवान विष्णू हे चार महिन्यांसाठी निद्राधीन होतात. हे चार महिने देवाधिदेव श्रीशंकर सृष्टीचे पालक बनतात, अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढनंतर येतो श्रावण मास, हा महिना महादेवाला समर्पित मानला जातो. खरे तर हिंदू धर्मात पूर्ण चार महिने म्हणजेच चातुर्मास पाळण्याची पद्धत आहे, परंतु कालौघात केवळ श्रावणालाच महत्त्व उरले आहे. यावर्षी अधिक मासामुळे निज आणि अधिक श्रावण असे दोन महिने येत आहेत. यामुळे बहुतांश भाविकांना श्रावणी सोमवार कोणत्या महिन्यात पाळायचे याबद्दल साशंकता आहे. जाणून घेऊया याबद्दल…
निज श्रावण आणि अधिक श्रावणात काय फरक? हिंदू कालगणनेत एका वर्षात प्रत्येकी ३० दिवसाचे १२ महिने असतात. त्यामुळे वर्षाचे दिवस होतात ३६० होता. पण पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात. त्यामुळे साधारणत: दर सहा वर्षांनी एक अधिक महिना धरावा लागतो. यालाच अधिक मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या वर्षी श्रावण हा अधिक मास आला आहे. अधिक मासात धार्मिक विधी करण्याची गरज नसते. ते सर्व लागूनच येणाऱ्या नियमितच्या श्रावण महिन्यात करायचे असतात. या नियमित श्रावण महिन्यालाच निज श्रावण म्हणतात. राशीचा स्वामी ग्रह असतो भाग्याचा कारक, कोणत्या वयात होणार तुमचा भाग्योदय श्रावण महिन्यात उपवास का करतात? श्रावणाचा हा काळ पावसाळ्याचा आहे. पावसाळ्यात आपली पचन व्यवस्था मंदावते. त्यामुळे आजार वाढू शकतात. त्यामुळे शास्त्रीय विचार करूनच चातुर्मास पाळण्याची हिंदूधर्मात रीती आहे. दुसरीकडे, हा महिना म्हणजे मराठी सणावारांचा असल्यानेही अत्यंत पवित्र गणला जातो. श्रावणात मांसाहार का करत नाहीत? आधी म्हटल्याप्रमाणे हे दिवस पावसाळ्याचे आहेत. वातावरण दमट असते आणि विषाणूंची वाढ या दिवसात खूप होते, त्यातल्या त्यात मृत जीवांवर जास्त होते. मांसाहार करायचा म्हटले की ते कापण्यापासून करून खाण्यापर्यंत बराच वेळ असतो. पण यात जास्त वेळ लागला तर विषाणू वाढू शकतात आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. या दिवसात आपण शिळे अन्नसुद्धा खाल्लं नाही पाहिजे. जोडीदाराला कधीही धोका देत नाहीत या 3 राशी, आयुष्यभर कायम राहतात प्रामाणिक दुसरी बाजू पाहिली तर, व्रत वैकल्य याचा हा महिना असतो. त्या दृष्टीने अपवित्र गोष्टी करू नये असा प्रघात आहे. पर्यावरणाची बाजू बघितली तर तळ्यात, नदीत, समद्रात मासे किंवा तसे जलचर प्राण्यांचा जननकाल असल्यामुळे नीट वाढ व्हावी म्हणून मांसाहार वर्ज्य असतो. पीक, प्राणी यांचीही वाढ होण्यासाठी पूर्वजांनी बंधन घातली आहेत. पूर्वी साथीचे रोग व्हायचे, पर्जन्यप्रमाण जास्त होते, मांस साठवण्याची व्यवस्था नीट नव्हती, वाहतूक व्यवस्था अपुरी होती, अशा अनेक कारणांमुळे मांस खाणे वर्ज्य होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)