मुंबई, 5 नोव्हेंबर : हिंदू धरर्मात चातुर्मासाला अतिशय महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो आणि चार महिन्यांनंतर कार्तिक महिन्याच्या देवउठनी एकादशीला संपतो. धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकदाशीला भगवानभगवान विष्णू योनिद्रेत जातात आणि देवउठनी एकदशीला योगनिद्रातून जागे होतात. याच्या दुसऱ्या दिवशी तुळशीविवाह होतो. चातुर्मास संपल्यानंतर 4 महिने रखडलेले मंगलकार्ये सुरु होतात. या वर्षी 4 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्रवारी देवउठनी एकादशी आहे आणि 5 नोव्हेंबरला शनिवारी तुळशीविवाह आहे. मात्र यंदा तुळशी विवाहानंतही लोकांना लग्नाच्या मुहूर्तासाठी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. तुळशी विवाहाचा दिवस हा अक्षय्य तृतीयेप्रमाणे विवाहासाठी अबूझ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्ताशिवाय विवाहसोहळा होऊ शकतो. परंतु यावर्षी ते शक्य होणार नाही.
Astro Tips : भीतीदायक स्वप्न आणि आर्थिक समस्यांतूनही मुक्त करतो लसूण; फक्त करा हे सोपे उपायहिंदू धर्मात प्रत्येक काम शुभ मुहूर्तावर करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. लग्न हे हिंदू धर्मातील अतिशय शुभ आणि मंगल कार्ये मानले जाते. लग्नासारख्या महत्त्वाच्या आणि शुभ कार्यासाठी शुक्र ग्रहाच्या स्थितीला खूप महत्त्व दिले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा उदय झाल्यावरच विवाह होऊ शकतो. लग्नाच्या शुभ मुहूर्तासाठी शुक्र नक्षत्राचा उदय आवश्यक मानला जातो. परंतु 2 ऑक्टोबरला अस्त होणाऱ्या शुक्र ग्रहाचा उदय 20 नोव्हेंबरला होईल.
झी न्यूजच्या वृत्तानुसार, शुक्र नक्षत्राच्या अस्तामुळे 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत विवाहचे मुहूर्त नसेल, त्यामुळे 20 नोव्हेंबरर्यंत विवाहाच्या मुहूर्तासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे यावर्षी देवउठनी एकादशीनंतरही विवाहासाठी थोड्याच तारखा उपलब्ध आहेत. नोव्हेंबर 2022 आणि डिसेंबर 2022 मध्ये लग्नासाठी फक्त 8 मुहूर्त आहेत. या मुहूर्तांमध्ये मंगलकार्ये झाले नाही तर लोकांना विवाह मुहूर्तांसाठी पुढच्या वर्षाची म्हणजेच 2023 सालची वाट पाहावी लागेल. यंदा दिवाळीनंतर विवाहासाठी किती आणि कोणते मुहूर्त? नोव्हेंबरमधील शुभ मुहूर्त 21 नोव्हेंबर 2022 24 नोव्हेंबर 2022 25 नोव्हेंबर 2022 27 नोव्हेंबर 2022 Dream Meaning : मनी वसे ते स्वप्नी दिसे; पण स्वप्नात जोडीदार दिसण्याचा समजून घ्या खरा अर्थ डिसेंबरमधील शुभ मुहूर्त 2 डिसेंबर 2022 7 डिसेंबर 2022 8 डिसेंबर 2022 9 डिसेंबर 2022