मुंबई, 06 ऑक्टोबर : अनेकांना खूप कष्ट करूनही पैसा नीट जमत नाही आणि अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले जाते. अशा स्थितीत पैशाची कमतरता आणि संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्र उपाय सांगतो. यापैकी एक उपाय म्हणजे लसणाचा उपाय. लसणाचा वापर सर्व घरांमध्ये केला जातो. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की ज्योतिष शास्त्रामध्ये आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लसणाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. लसूण नशीब बलवत्तर बनवून आर्थिक संकटातूनही सुटका करते. ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी लसणाशी संबंधित अशाच काही उपायांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घेऊया लसणाचे काही सोपे उपाय.
Dream Meaning : मनी वसे ते स्वप्नी दिसे; पण स्वप्नात जोडीदार दिसण्याचा समजून घ्या खरा अर्थलसणाचे उपाय - ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांमुळे सतत त्रास होत असेल. तर अशा स्थितीत व्यक्तीने शनिवारी आपल्या पाकिटात लसणाची एक पाकळी ठेवावी. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. - जर एखाद्या व्यक्तीला कठोर परिश्रम करूनही फळ मिळत नसेल किंवा कमवलेला पैसा त्याच्या पाठीशी उभा राहत नसेल तर लसणाच्या तीन पाकळ्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवाव्यात. असे केल्याने पैसा व्यर्थ खर्च होणार नाही.
- ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात सतत नुकसान होत असेल आणि तो त्यातून भरून निघू शकत नसेल तर अशा व्यक्तीने शनिवारी आपल्या व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी लाल कपड्यात लसणाच्या पाच पाकळ्या दारात बांधल्या पाहिजे. असे केल्याने तुम्हाला लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील. डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा - ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, काही लोकांना रात्री झोपताना खूप भयानक स्वप्न पडतात. ज्यामुळे त्यांचा पुढचा संपूर्ण दिवस खराब होतो. जर तुम्हालाही अशी भीतीदायक स्वप्ने पडत असतील. तर झोपण्यापूर्वी तुम्ही उशीखाली लसणाच्या तीन पाकळ्या ठेवू शकता. सकाळी उठून चौरस्त्यावर फेकून द्या. असे केल्याने भीतीदायक स्वप्न येणे लवकरच थांबेल.