मराठी बातम्या /बातम्या /religion /

Dream Meaning : मनी वसे ते स्वप्नी दिसे; पण स्वप्नात जोडीदार दिसण्याचा समजून घ्या खरा अर्थ

Dream Meaning : मनी वसे ते स्वप्नी दिसे; पण स्वप्नात जोडीदार दिसण्याचा समजून घ्या खरा अर्थ

स्वप्न शास्त्रात लिहिलेल्या गोष्टींवर अनेकांचा विश्वास असतो. त्यामुळे काही लोक फक्त एक साधी घटना म्हणून स्वप्नाकडे दुर्लक्ष करतात. स्वप्न शास्त्रात असे लिहिले आहे की कोणत्याही व्यक्तीची स्वप्ने त्याच्यासोबत घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 16 सप्टेंबर : स्वप्ने पाहणे ही एक सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती झोपेत असताना स्वप्ने पाहतो. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्ने आपल्याला भविष्यातील जीवनाबद्दल निश्चितपणे काही संकेत देतात. प्रत्येक व्यक्तीची स्वप्ने वेगवेगळ्या प्रकारची असतात. स्वप्नविज्ञानाशिवाय ज्योतिषशास्त्रातही स्वप्नांबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी स्वप्नात प्रियकर दिसण्याचा काय अर्थ आहे याबद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी स्वप्नात भांडताना किंवा रोमान्स करताना दिसला तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो? जाणून घेऊया.

स्वप्नात प्रियकर किंवा प्रेयसी दिसणे

स्वप्नशास्त्राचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात प्रियकर किंवा प्रेयसी दिसली तर याचा अर्थ असा होतो की आगामी आयुष्यात तुमचे प्रेमप्रकरण सुरू होणार आहे.

घरात अशा घटना घडणं अशुभ; अडचणी वाढणे, आर्थिक स्थिती बिघडण्याचे असतात ते संकेत

ज्योतिष शास्त्रात असेही म्हटले आहे की जर तुमची प्रेयसी स्वप्नात लाल रंगाचे कपड्यांमध्ये दिसली. तर तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात नक्कीच यश मिळेल. जर प्रेयसी लेहेंग्यात दिसली तर तुमचे तिच्याशी लग्न होण्याची शक्यता वाढेल.

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या मैत्रिणीला ब्रेसलेट घातलेले पहिले तर याचा अर्थ असा आहे की तुमची मैत्रीण हीच तुमच्या आयुष्याची जोडीदार होण्यासाठी पात्र आहे. याशिवाय ते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशांचेदेखील संकेत असतात.

जर तुम्हाला स्वप्नात तुमची प्रेयसी मिठाई खाताना दिसली तर ते तुमच्या आयुष्यात एक शुभ संकेत देते. याचा अर्थ तुमचे संपूर्ण आयुष्य प्रेमाने भरलेले असेल. याशिवाय स्वप्नात प्रेयसीला देवदूताच्या रूपात पाहणे हेही तुमचे नशीब बदलण्याचे स्वप्न असते.

जर तुमची प्रेयसी स्वप्नात ससा किंवा पोपट सारख्या पाळीव प्राण्यासोबत दिसली. तर हे लक्षण आहे की तुम्ही लवकरच तुमच्या प्रेयसीला भेटणार आहात.

जर तुम्हाला स्वप्नात प्रियकर-प्रेयसीचे लग्न झालेले दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही आतून कमजोर होत आहात किंवा तुमच्या प्रियकरावरील प्रेम कमी होत आहे.

डायनिंग टेबल घरात कोणत्या दिशेला असावे? त्याचे हे वास्तु नियम ध्यानात ठेवा

जर एखाद्या स्वप्नात तुम्हाला तुमचा प्रियकर-प्रेयसी रडताना पाहत असाल तर ते तुमच्यासाठी दुःखाचे कारण असू शकते. असे मानले जाते की हे स्वप्न सूचित करते की आगामी काळात तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. जे तुमच्या नात्यासाठी चांगले नाही.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Religion, Vastu