सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 7 जून : घराच्या अंगणात तुळस लावणं हा शो पिस नाही, तर घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी, यासाठी केलेला रामबाण उपाय असतो. आयुर्वेदात तुळशीचे आरोग्यासाठी गुणकारी उपाय सांगण्यात आले आहेत. तुळस ही हिंदू धर्मानुसार पूजनीय मानली जाते. ज्या घरात तुळस असते तिथे आजारपण कमी येतं अशीही मान्यता आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी तुळशीच्या रोपाचं धार्मिक महत्त्व सांगितलं आहे. ते काय, जाणून घेऊया. पंडित कल्की राम सांगतात, आपल्या आयुष्यात एकामागून एक संकटं येत असतील. जगातली सगळी संकटं माझ्याच आयुष्यात आहेत, असं आपल्याला वाटत असेल तर आपण दररोज तुळशीच्या रोपाला पाणी द्यायला हवं. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावायला हवा. यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्याही दूर होतील आणि आपल्यासमोर कमाईचे अनेक मार्ग खुले होतील. आपल्याला जणू देवी लक्ष्मीच प्रसन्न होईल.
आपण हाती घेतलेलं काम काही केल्या पूर्ण होत नसेल, त्या कामात या ना त्या मार्गाने अडचणी येत असतील तर तुळशीचं लहानसं खोड घेऊन त्याला गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या खोडाची विधिवत पूजा करा. पूजेनंतर ते पिवळ्या कापडात बांधून स्वतःजवळ ठेवा. असं दररोज नियमितपणे केल्यास आपली थकलेली कामं सहज पूर्ण होतील आणि आपल्याला अपयशापासून मुक्ती मिळेल. Ajab Gajab : जगातील सर्वात महागडा खरबूज, किंमत अशी की तुम्ही विचार देखील करु शकणार नाही ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच ज्या घरात तुळशीचं रोप असेल त्या घरात सकारात्मकता निर्माण होते आणि ती टिकून राहते. त्याचबरोबर तुळशीच्या खोडांची माळ गळ्यात घातल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्यापासून दूर राहते. शिवाय आपल्यातली नकारात्मकताही निघून जाते. खरंतर आपल्या जन्म कुंडलीचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती शांत ठेवायची असेल, तर दररोज तुळशीची पूजा करणं अतिशय उपयुक्त ठरतं, असं पंडित कल्की राम यांनी सांगितलं आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

)







