जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / जेवताना घडणाऱ्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; भविष्यात येऊ शकतात अडचणी

जेवताना घडणाऱ्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; भविष्यात येऊ शकतात अडचणी

जेवताना घडणाऱ्या या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; भविष्यात येऊ शकतात अडचणी

शकुन शास्त्रानुसार जीवनात अशा अनेक प्रकारच्या घटना घडत असतात ज्यामुळे भविष्यातील शुभ आणि अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात. तुम्ही या घटनांकडे वेळीच लक्ष दिले तर भविष्यातील संकट टाळता येऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 नोव्हेंबर : आपण आपल्या दिनचर्येत अनेक प्रकारची कामे करतो. वेगवेगळी कामं करताना काही अशा घटना घडतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जेवण करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं काही वेळा महागात पडू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का? असे म्हटले जाते जेवताना घडणाऱ्या काही घटनांचा परिणाम तुमच्या भविष्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला खूप मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. शकुन शास्त्रानुसार जीवनात अशा अनेक प्रकारच्या घटना घडत असतात ज्यामुळे भविष्यातील शुभ आणि अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळतात. तुम्ही या घटनांकडे वेळीच लक्ष दिले तर भविष्यातील संकट टाळता येऊ शकतात. आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जेवताना घडणाऱ्या कोणत्या घटना अशुभ आणि अशुभाचे संकेत देतात याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

शुभ घटना घडण्याअगोदर हे संकेत दिसू लागतात, ओळखण्यासाठी या टिप्स वापरा

अन्नाशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या हातातून वारंवार अन्न पडणे : तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेवण देत असाल आणि तुमच्या हातातून जेवणाचे ताट वारंवार पडत असेल किंवा कोणतीही डिश तुमच्या हातातून वारंवार खाली पडत असेल, ते अशुभ मानले जाते. हे भविष्यात घराघरात दारिद्र्य येण्याचे संकेत मानले जाते.तसेच हे असेही सूचित करते की तुम्ही जेवताना लक्ष केंद्रित करू शकत नाही किंवा तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असू शकतात ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

News18लोकमत
News18लोकमत

जेवताना कुत्रा येणे : शास्त्रानुसार जेवताना कुत्रा आला तर ते अशुभ मानले जाते. कुत्रा पाळीव असला तर फारसा विचार करू नका. कुत्रा शेपूट वर करून डोके हलवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि ते अन्न खाऊ नये. असे अन्न खाल्ल्यास शारीरिक त्रास होऊ शकतो असे मानले जाते. जेवणात केस येणे : जेवणात वारंवार केस येणे अशुभ मानले जाते. मात्र अधूनमधून ही घटना घडल्यास त्याकडे दुर्लक्ष करू शकता. परंतु वारंवार अशी घटना घडणे हे धनहानी आणि मोठ्या संकटाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे अशी घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असेल, तर सावध व्हा. हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश अन्नामध्ये वारंवार केस गळणे हे राहूचा व्यक्तीवर वाईट परिणाम होणार असल्याचे देखील संकेत मानले जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नामध्ये वारंवार केस गळणे हे तुमचे अन्न अस्वच्छ आहे आणि तुम्ही लवकरच आजारी पडण्याची शक्यता असल्याचे सूचित करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात